मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shoaib Akhtar: शोएबनं केलं पाकिस्तानी गोलंदाजांचं कौतुक; म्हणाला, आता भारतात येऊन वर्ल्डकप जिंकणार

Shoaib Akhtar: शोएबनं केलं पाकिस्तानी गोलंदाजांचं कौतुक; म्हणाला, आता भारतात येऊन वर्ल्डकप जिंकणार

Nov 14, 2022, 11:24 AM IST

    • Shoaib Akhtar after losing t20 world cup final: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्याने पाकिस्तान संघाचे कौतुक केले आहे. सोबतच पुढील वर्षी भारतात येऊन वर्ल्डकप ट्रॉफी जिंकू, असे शोएबने म्हटले आहे. पुढचा वनडे वर्ल्डकप २०२४ मध्ये भारतात होणार आहे.
shoaib akhtar

Shoaib Akhtar after losing t20 world cup final: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्याने पाकिस्तान संघाचे कौतुक केले आहे. सोबतच पुढील वर्षी भारतात येऊन वर्ल्डकप ट्रॉफी जिंकू, असे शोएबने म्हटले आहे. पुढचा वनडे वर्ल्डकप २०२४ मध्ये भारतात होणार आहे.

    • Shoaib Akhtar after losing t20 world cup final: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्याने पाकिस्तान संघाचे कौतुक केले आहे. सोबतच पुढील वर्षी भारतात येऊन वर्ल्डकप ट्रॉफी जिंकू, असे शोएबने म्हटले आहे. पुढचा वनडे वर्ल्डकप २०२४ मध्ये भारतात होणार आहे.

ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक २०२२ या स्पर्धेचा समारोप झाला आहे. १३ नोव्हेंबरला झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. या विजयासह इंग्लंडने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला . तर पाकिस्तानचे दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचे स्वप्न भंगले.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्याने पाकिस्तान संघाचे कौतुक केले आहे. सोबतच पुढील वर्षी भारतात येऊन वर्ल्डकप ट्रॉफी जिंकू, असे शोएबने म्हटले आहे. पुढचा वनडे वर्ल्डकप २०२४ मध्ये भारतात होणार आहे.

पाकिस्तानी गोलंदाजांचं कौतुक

शोएब अख्तर त्याच्या युट्युब चॅनलवर बोलत होता. यावेळी तो म्हणाला की, पाकिस्तानचा पराभव झाला, पण संघाने चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. पाकिस्तानी गोलंदाजांनी संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली. त्यांनीच संघाला फायनलपर्यंत पोहोचवले. नशीबाचीदेखील साथ होती. पण संघाचीही मेहनत होती'.

तसेच, अख्तर पुढे म्हणाला की, ''काही हरकत नाही, पाकिस्तान आणि मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही खूप छान खेळला. शाहीनची दुखापत सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. पण काही हरकत नाही. इंशाअल्लाह आता आपण भारतात वर्ल्डकप ट्रॉफी जिंकवून दाखवू.'

T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये काय घडलं?

मेलबर्नमध्ये रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १३७ धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून केवळ बाबर आझम (३२) आणि शान मसूद (३८) हेच मोठी खेळी करू शकले, त्यांच्याशिवाय कोणीही चांगली कामगिरी करू शकले नाही. दुसरीकडे, इंग्लंडकडून बेन स्टोक्सने (नाबाद ५२) धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळेच इंग्लंडने १९ षटकात विजयी लक्ष्य गाठले.

पुढील बातम्या