मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Viral Video: डॅनी मॉरिसनने भर मैदानात प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या पत्नीला... व्हिडिओ प्रचंड व्हायरल!

Viral Video: डॅनी मॉरिसनने भर मैदानात प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या पत्नीला... व्हिडिओ प्रचंड व्हायरल!

Mar 07, 2023, 02:40 PM IST

  • Danny Morrison and Erin Holland: डॅनी मॉरिसन आणि एरिन हॉलंड यांच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.

Danny Morrison, Erin Holland

Danny Morrison and Erin Holland: डॅनी मॉरिसन आणि एरिन हॉलंड यांच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.

  • Danny Morrison and Erin Holland: डॅनी मॉरिसन आणि एरिन हॉलंड यांच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.

Pakistan Super League: पाकिस्तान सुपर लीगचा आठवा हंगाम शेवटच्या टप्प्यावर पोहचला आहे. या हंगामातील आतापर्यंत २१ सामने पार पडले आहे. या हंगामात ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू बेन कटिंगची पत्नी एरिन हॉलंड आणि न्यूझीलंडचा माजी खेळाडू डॅनी मॉरिसन प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर या दोघांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकाला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

एरिन हॉलंडने स्वत: तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एरिन हॉलंड आणि मॉरिसन कॉमेंट्री करताना दिसत आहेत. यादरम्यान, एरिन हॉलंड सामन्याबद्दलच्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात व्यस्त असते. त्यावेळी मॉरिसन अचानक तिच्या जवळ जातो आणि एरिन हॉलंडला उचलून घेऊन गरागरा फिरवतो. मॉरिसनच्या या अचानक केलेल्या कृत्यामुळे मैदानातील प्रत्येकजण आश्चर्यचकीत होतात. हा व्हिडिओ शेअर करताना हॉलंडने कॅप्शनमध्ये 'लव्ह यू अंकल' असे लिहले आहे.

यापूर्वीही मॉरिसनने एका चीअरलीडरसोबत असेच कृत्य केले होते. भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मॉरिसनने चीअरलीडरला आपल्या मांडीवर उचलले होते. त्यानंतर बराच गदारोळ झाला होता. मात्र, यंदा मॉरिसनने थेट बेन कटिंगच्या पत्नीला उचलल्यामुळे त्याचे चाहते सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत.

विभाग

पुढील बातम्या