मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 : कोहली आणि गांगुलीतील संघर्ष शिगेला, इन्स्टाग्रामवर एकमेकांना केलं अनफॉलो

IPL 2023 : कोहली आणि गांगुलीतील संघर्ष शिगेला, इन्स्टाग्रामवर एकमेकांना केलं अनफॉलो

Apr 18, 2023, 03:31 PM IST

    • Virat Kohli vs Sourav Ganguly : दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहलीने सौरव गांगुलीशी हस्तांदोलन करणं टाळलं होतं.
Virat Kohli vs Sourav Ganguly (HT)

Virat Kohli vs Sourav Ganguly : दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहलीने सौरव गांगुलीशी हस्तांदोलन करणं टाळलं होतं.

    • Virat Kohli vs Sourav Ganguly : दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहलीने सौरव गांगुलीशी हस्तांदोलन करणं टाळलं होतं.

Virat Kohli vs Sourav Ganguly : टीम इंडियाच्या कर्णधारपदावरून विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यात सुरू झालेला वाद आता टोकाला पोहचला आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबीमध्ये सामना झाल्यानंतर विराट कोहलीने सौरव गांगुलीशी हस्तांदोलन करणं टाळलं होतं. त्यानंतर आता दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याची माहिती समोर आली आहे. सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्सचा संचालक आहे. तर विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून गेल्या अनेक वर्षांपासून खेळत आहे. त्यामुळं आता भारताच्या दोन यशस्वी माजी कर्णधारांमध्ये सुरू असलेला वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

विराट कोहलीने २०२१ सालचा टी-ट्वेंटी विश्वचषक संपल्यानंतर टी-ट्वेंटीचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी टी-ट्वेंटी आणि वनडे संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे न देता रोहित शर्माकडे सोपवलं होतं. त्यावेळी संघाची घोषणा होण्यापूर्वी एक तासाआधी याबाबतची माहिती देण्यात आल्याचा आरोप विराट कोहलीने केला होता. यावरून विराट कोहली आणि सौरव गांगुली यांनी परस्परविरोधी वक्तव्य केल्यामुळं कर्णधारपदावरून राजकारण सुरू असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर आता दोघांमधील संबंधात कटूता आल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

CSK vs RCB IPL 2023 : धोनीची 'ती' घोडचूक सीएसकेला महागात पडली असती, पण…

विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर २४६ दशलक्ष फॉलोवर्स आहेत, तर सौरव गांगुलीचे तीन दशलक्ष फॉलोवर्स आहेत. गांगुली १०६ तर कोहली २७६ लोकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतो. दोन्ही खेळाडू यापूर्वी एकमेकांना फॉलो करत होते. परंतु दिल्ली आणि आरसीबीच्या सामन्यानंतर दोघांनी एकमेकांना भेटणं टाळलं होतं. त्यानंतर आता दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.

पुढील बातम्या