मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma: अरेरे... रोहित शर्मासोबत 'हे' काय घडलं? धोनीसोबत असं कधीच झालं नाही

Rohit Sharma: अरेरे... रोहित शर्मासोबत 'हे' काय घडलं? धोनीसोबत असं कधीच झालं नाही

Oct 05, 2022, 02:05 PM IST

    • Rohit Sharma record IND vs SA 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात रोहित शर्मा एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. अशाप्रकारे, रोहित शर्मा हा भारतीय कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाला आहे.
Rohit sharma

Rohit Sharma record IND vs SA 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात रोहित शर्मा एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. अशाप्रकारे, रोहित शर्मा हा भारतीय कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाला आहे.

    • Rohit Sharma record IND vs SA 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात रोहित शर्मा एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. अशाप्रकारे, रोहित शर्मा हा भारतीय कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला ४९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र, भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकून मालिका २-१ अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतासमोर विजयासाठी २० षटकात २२८ धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु टीम इंडिया १८.३ षटकात केवळ १७८ धावाच करु शकली. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेचा संघ मालिकेत क्लीन स्वीप होण्यापासून वाचला. भारताकडून दिनेश कार्तिकने २१ चेंडूत सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

टी-२० मध्ये सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होणारा खेळाडू

दक्षिण आफ्रिकेच्या २२८ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच षटकात शुन्यावर बाद झाला. त्याला कागिसो रबाडाने त्रिफळाचीत केले. यासह रोहित शर्माने आपल्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला आहे. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १० वेळा शून्यावर बाद होणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. रोहित टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. रोहितने भारतासाठी १४२ सामन्यात ३७३७ धावा केल्या आहेत.

सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होणारा कर्णधार

तसेच, रोहित हा या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होणारा भारतीय कर्णधारदेखील ठरला आहे. कर्णधार म्हणून रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये ४ वेळा शुन्यावर बाद झाला आहे. त्याचबरोबर या यादीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहली दुसऱ्या तर शिखर धवन तिसऱ्या क्रमांकावर आहे.

विराट कोहली कर्णधार म्हणून ३ वेळा शुन्यावर बाद

विराट कोहली कर्णधार म्हणून ३ वेळा एकही धाव न काढता बाद झाला. तर शिखर धवन कर्णधार म्हणून एकदा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. मात्र, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियाचा कर्णधार म्हणून ६२ डावात फलंदाजी केली, पण तो कधीही शून्यावर बाद झाला नाही. त्याचवेळी, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्याबद्दल सांगायचे तर, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाहुण्या संघाने रिली रॉसोच्या नाबाद शतकाच्या जोरावर २० षटकांत ३ गडी गमावून २२७ धावा केल्या होत्या. रोसोने ४८ चेंडूत ८ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने १०० धावा केल्या.

पुढील बातम्या