मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Deepak Chahar: ‘दीप्ती शर्मावर टीका करणारे आता दीपक चहरचं कौतुक करतील का?’

Deepak Chahar: ‘दीप्ती शर्मावर टीका करणारे आता दीपक चहरचं कौतुक करतील का?’

Oct 04, 2022, 09:48 PM IST

    • Deepak Chahar mankding Tristan Stubbs: भारताचा गोलंदाज दीपक चहरने आफ्रिकेचा फलंदाज ट्रिस्टन स्टब्सला मोठे जीवदान दिले. स्टब्सला मांकडिंगद्वारे धावबाद करण्याची संधी दीपक चहरकडे होती, मात्र, त्याने त्याला बाद केले नाही.
Deepak Chahar mankding

Deepak Chahar mankding Tristan Stubbs: भारताचा गोलंदाज दीपक चहरने आफ्रिकेचा फलंदाज ट्रिस्टन स्टब्सला मोठे जीवदान दिले. स्टब्सला मांकडिंगद्वारे धावबाद करण्याची संधी दीपक चहरकडे होती, मात्र, त्याने त्याला बाद केले नाही.

    • Deepak Chahar mankding Tristan Stubbs: भारताचा गोलंदाज दीपक चहरने आफ्रिकेचा फलंदाज ट्रिस्टन स्टब्सला मोठे जीवदान दिले. स्टब्सला मांकडिंगद्वारे धावबाद करण्याची संधी दीपक चहरकडे होती, मात्र, त्याने त्याला बाद केले नाही.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना इंदूरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला २२८ धावांचे लक्ष्य दिले आहे. आफ्रिकन संघाकडून रिली रुसोने अप्रतिम फलंदाजी करताना ४८ चेंडूत ८ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने १०० धावा केल्या. त्याचवेळी, या सामन्यात भारताचा गोलंदाज दीपक चहरने आफ्रिकेचा फलंदाज ट्रिस्टन स्टब्सला मोठे जीवदान दिले. स्टब्सला मांकडिंगद्वारे धावबाद करण्याची संधी दीपक चहरकडे होती, मात्र, त्याने त्याला बाद केले नाही.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

सामन्याच्या १६ व्या षटकात ही घटना घडली. स्टब्स आणि रुसो भारतीय गोलंदाजांची धुलाई करत होते. अशा परिस्थितीत गोलंदाज दीपक चहरकडे स्टब्सला मांकडिंगद्वारे बाद करण्याची सुवर्ण संधी होती. मात्र, चहरने तसे केले नाही. दीपक गोलंदाजी करण्यासाठी क्रीजजवळ आला तेव्हा स्टब्स क्रीजच्या बाहेर होता. आफ्रिकन फलंदाज चौकार षटकारांची आतषबाजी करत असताना दीपकने हे मोठे मन दाखवल्याबद्दल सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले जात आहे.

दिप्ती शर्माच्या खिलाडूवृत्तीवर शंका घेणारे दीपक चहरचं कौतुक करतील का?

दरम्यान, आता दिप्ती शर्माच्या खिलाडूवृत्तीवर शंका घेणारे दीपक चहरचे कौतुक करतील का? असा प्रश्नही भारतीय चाहते विचारत आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार ऑलराऊंडर दीप्ती शर्माने इंग्लंडची फलंदाज चार्ली डीनला मांकडिंगद्वारे धावबाद केले होते. त्यानंतर तिच्यावर इंग्लंडच्या आजी माजी खेळाडूंनी प्रचंड टीका केली होती. अशा परिस्थितीत आता इंग्लंडचे खेळाडू दीपक चहरचे कौतुक करायला पुढे येतील का? असा प्रश्न चाहते विचारत आहेत.

भारताला २२८ धावांचे लक्ष्य

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने मोठी धावसंख्या उभारली आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २२७ धावा केल्या आहेत. कर्णधार टेम्बा बावुमाला लवकर गमावल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेने आक्रमण सुरूच ठेवले आणि भारतीय गोलंदाजांवर दबाव आणला. आफ्रिकेला क्लीन स्वीप देण्याासठी भारताला २२८ धावा करायच्या आहेत.

पुढील बातम्या