मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rishabh Pant: दुखापत नव्हे, 'या' कारणामुळं ऋषभ पंतची संघातून हकालपट्टी?

Rishabh Pant: दुखापत नव्हे, 'या' कारणामुळं ऋषभ पंतची संघातून हकालपट्टी?

Dec 04, 2022, 05:20 PM IST

    • Rishabh Pant Released From Team India, ODI Series vs Bangladesh: ऋषभ पंत असा अचानक वनडे मालिकेतून बाहेर पडला, याचे कारण दुखापत नसून काही औरच असल्याचे बोलले जात आहे. BCCI शी संबंधित गोपनीय सूत्रांकडून ही माहिती समोर येत आहे. टीम मॅनेजमेंटला ६ गोलंदाजांसह मैदानात उतरायचे होते.
Rishabh Pant

Rishabh Pant Released From Team India, ODI Series vs Bangladesh: ऋषभ पंत असा अचानक वनडे मालिकेतून बाहेर पडला, याचे कारण दुखापत नसून काही औरच असल्याचे बोलले जात आहे. BCCI शी संबंधित गोपनीय सूत्रांकडून ही माहिती समोर येत आहे. टीम मॅनेजमेंटला ६ गोलंदाजांसह मैदानात उतरायचे होते.

    • Rishabh Pant Released From Team India, ODI Series vs Bangladesh: ऋषभ पंत असा अचानक वनडे मालिकेतून बाहेर पडला, याचे कारण दुखापत नसून काही औरच असल्याचे बोलले जात आहे. BCCI शी संबंधित गोपनीय सूत्रांकडून ही माहिती समोर येत आहे. टीम मॅनेजमेंटला ६ गोलंदाजांसह मैदानात उतरायचे होते.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला वनडे सामना आज (४ डिसेंबर) ढाका येथे सुरू आहे. मात्र, या सामन्याच्या काही तास अगोदर विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत या मालिकेतून बाहेर पडला. नाणेफेक होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट करून पंत मालिकेतून बाहेर झाल्याचे सांगितले. 

ट्रेंडिंग न्यूज

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानंतर दुखापतग्रस्त ऋषभ पंत मालिकेतून बाहेर पडल्याचे BCCI ने ट्वीटमध्ये सांगितले होते. तसेच, पंतच्या जागी कोणत्याही बदली खेळाडूची घोषणा करण्यात आलेली नाही. केएल राहुलकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मात्र, ऋषभ पंत असा अचानक वनडे मालिकेतून बाहेर पडला, याचे कारण दुखापत नसून काही औरच असल्याचे बोलले जात आहे. BCCI शी संबंधित गोपनीय सूत्रांकडून ही माहिती समोर येत आहे.

परफेक्ट प्लेईंग ११ साठी ऋषभ पंतला डच्चू

सुत्राने सांगितले की, टीम मॅनेजमेंटला ६ गोलंदाजांसह मैदानात उतरायचे होते. पंत आणि राहुल दोघेही प्लेईंग ११ मध्ये असते तर ते शक्य झाले नसते. अशा परिस्थितीत प्लेइंग इलेव्हनमध्ये केवळ ५ गोलंदाजांचा समावेश होऊ शकला असता. सोबतच ऋषभ पंत सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. त्यामुळेच त्याला वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कसोटी मालिकेसाठी पंत भारतीय संघात परतणार आहे.

दुसऱ्या फलंदाजाला वगळणे शक्य नव्हते

श्रेयस अय्यरने न्यूझीलंड दौऱ्यात चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नव्हते. शिखर धवन असल्याने पंतला सलामीला खेळवणेही शक्य नव्हते. शिखर धवन २०२३ च्या विश्वचषक प्लॅनचा भाग आहे. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त संधी देण्यात येणार आहे. तर केएल राहुल संघाचा उपकर्णधार आहे, त्यामुळे त्याला संधाबाहेर ठेवता येणे शक्य नव्हते.

ऋषभ पंतची खराब कामगिरी

दिनेश कार्तिकसह पंतचा T20 विश्वचषकात भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. त्याला झिम्बाब्वे आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांत संधी मिळाली. दोन्ही सामन्यात तो विशेष काही करू शकला नाही. दोन सामन्यात त्याने ९ धावाच केल्या. यानंतर पंत न्यूझीलंड दौऱ्यावर ३ टी-20 आणि ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत संघाचा भाग होता. टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांच्या ४ डावांत त्याला केवळ ४२ धावाच करता आल्या.

पुढील बातम्या