मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli Wicket: वाह लिटन दास! यापेक्षा अफलातून काहीच नाही; विराटच्या रिअ‍ॅक्शननंच सर्व सांगितलं

Virat Kohli Wicket: वाह लिटन दास! यापेक्षा अफलातून काहीच नाही; विराटच्या रिअ‍ॅक्शननंच सर्व सांगितलं

Dec 04, 2022, 03:55 PM IST

    • Virat Kohli Litton das catch IND vs BAN: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला वनडे सामना ढाका येथे सुरू आहे. या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली. त्यांचे सुरूवातीचे ३ फलंदाज अवघ्या ४९ धावांत तंबूत परतले. भारताची तिसरी विकेट विराट कोहलीच्या रूपात पडली. शाकिब अल हसनने कोहलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कोहलीच्या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Litton das catch

Virat Kohli Litton das catch IND vs BAN: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला वनडे सामना ढाका येथे सुरू आहे. या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली. त्यांचे सुरूवातीचे ३ फलंदाज अवघ्या ४९ धावांत तंबूत परतले. भारताची तिसरी विकेट विराट कोहलीच्या रूपात पडली. शाकिब अल हसनने कोहलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कोहलीच्या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

    • Virat Kohli Litton das catch IND vs BAN: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला वनडे सामना ढाका येथे सुरू आहे. या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली. त्यांचे सुरूवातीचे ३ फलंदाज अवघ्या ४९ धावांत तंबूत परतले. भारताची तिसरी विकेट विराट कोहलीच्या रूपात पडली. शाकिब अल हसनने कोहलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कोहलीच्या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडिया अवघ्या १८६ धावांत गारद झाली आहे. बांगलादेशच्या शाकिब अल हसनच्या फिरकीच्या जाळ्यात भारताचे ५ फलंदाज अडकले. भारताचा संपूर्ण संघ ४१.१ षटकात १८६ धावांवर ऑलआऊट झाला. भारत आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडिया अवघ्या १८६ धावांत गारद झाली आहे. बांगलादेशच्या शाकिब अल हसनच्या फिरकीच्या जाळ्यात भारताचे ५ फलंदाज अडकले. भारताचा संपूर्ण संघ ४१.१ षटकात १८६ धावांवर ऑलआऊट झाला.

ट्रेंडिंग न्यूज

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

तत्पूर्वी, या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. भारताचे सुरूवातीचे ३ महत्वाचे फलंदाज अवघ्या ४९ धावांत तंबूत परतले. भारताची तिसरी विकेट विराट कोहलीच्या रूपात पडली. तो अवघ्या ९ धावा करून बाद झाला. शाकिब अल हसनने कोहलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कोहलीच्या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यादरम्यान त्याने अवघ्या १५ चेंडूंचा सामना केला आणि ९ धावा करून तो बाद झाला. ११व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कोहली झेलबाद झाला. शाकिबच्या गोलंदाजीवर कर्णधार लिटन दासने हवेत झेप घेत त्याचा अप्रतिम झेल घेतला. लिटन दासच्या या अफलातून झेलचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. शिवाय या व्हिडिओवर अनेक कमेंट्सदेखील येत आहेत.

विराट कोहली बाद झाल्यानंतर टीम इंडिया अडचणीत सापडली होती. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र,  परंतु इबादत हुसेनने अय्यरचा डाव संपवला. श्रेयस अय्यरने ३९ चेंडूत २४ धावा केल्या. यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि राहुललने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी ६० धावांची भागीदारी केली. शाकिबच्या चेंडूवर सुंदरने रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला पण तो झेलबाद झाला. सुंदरने ४३ चेंडूत १९ धावा केल्या.

या दरम्यान, केएल राहुलने एक बाजू लावून धरत ७० चेंडूत ७३ धावा केल्या. त्याच्या खेळीत ५ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. राहुल-सुंदरच्या बळावरच भारताने १८६ धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने ५ तर इबादत हसनने ४ विकेट घेतल्या.

पुढील बातम्या