मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs BAN 1st ODI: शाकिबच्या फिरकीसमोर टीम इंडिया १८६ धावांत गारद, केएल राहुल एकटाच लढला

IND vs BAN 1st ODI: शाकिबच्या फिरकीसमोर टीम इंडिया १८६ धावांत गारद, केएल राहुल एकटाच लढला

Dec 04, 2022, 02:50 PM IST

    • India vs Bangladesh (IND vs BAN) 1st ODI scorecard: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला वनडे सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी १८७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
IND vs BAN 1st ODI

India vs Bangladesh (IND vs BAN) 1st ODI scorecard: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला वनडे सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी १८७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

    • India vs Bangladesh (IND vs BAN) 1st ODI scorecard: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला वनडे सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी १८७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडिया अवघ्या १८६ धावांत गारद झाली आहे. बांगलादेशच्या शाकिब अल हसनच्या फिरकीच्या जाळ्यात भारताचे ५ फलंदाज अडकले. भारताचा संपूर्ण संघ ४१.१ षटकात १८६ धावांवर ऑलआऊट झाला.

ट्रेंडिंग न्यूज

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ७३ धावा केल्या. या सामन्यात राहुलने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. 

तत्पूर्वी, बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय बांगलादेशी गोलंदाजांनी योग्य ठरवला. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. शिखर धवन (७) आणि रोहित शर्मा २७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. शाकिबने रोहित शर्माला आपली पहिली शिकार बनवले. त्यानंतर त्याने विराटची शिकार केली. कोहलीला केवळ ९ धावा करता आल्या. 

केएल राहुल- सुंदर यांनी सावरला डाव

भारताची धावसंख्या ३ गडी बाद ४९ धावा अशी होती. या दरम्यान, श्रेयस अय्यर आणि राहुल यांच्यात भागीदारी होत असल्याचे दिसत होते, परंतु इबादत हुसेनने अय्यरचा डाव संपवला. श्रेयस अय्यरने ३९ चेंडूत २४ धावा केल्या. यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि राहुललने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी ६० धावांची भागीदारी केली. शाकिबच्या चेंडूवर सुंदरने रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला पण तो झेलबाद झाला. सुंदरने ४३ चेंडूत १९ धावा केल्या. 

या दरम्यान, केएल राहुलने एक बाजू लावून धरत ७० चेंडूत ७३ धावा केल्या. त्याच्या खेळीत ५ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. यानंतर शाकिबने शाहबाज अहमदला खातेही उघडू दिले नाही. शार्दुल ठाकूर (२२) हादेखील त्याचाच बळी ठरला.

बांगलादेशकडून शाकिब अल हसनने ५ तर इबादत हसनने ४ विकेट घेतल्या.

पुढील बातम्या