मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Maharashtra Kesari 2023: 'महाराष्ट्र केसरी'चं बक्षीस किती माहितीय का? पैलवान होणार मालामाल!

Maharashtra Kesari 2023: 'महाराष्ट्र केसरी'चं बक्षीस किती माहितीय का? पैलवान होणार मालामाल!

Jan 10, 2023, 11:06 AM IST

    • Maharashtra kesari wrestling tournament : पुण्यात १० जानेवारी रोजी महाराष्ट्र केसरीचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत तीन महाराष्ट्र केसरी पुन्हा भिडणार आहेत. यामुळे पुणेनगरी कुस्तीमय झाली आहे.
Maharashtra Kesari 2023 (social media)

Maharashtra kesari wrestling tournament : पुण्यात १० जानेवारी रोजी महाराष्ट्र केसरीचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत तीन महाराष्ट्र केसरी पुन्हा भिडणार आहेत. यामुळे पुणेनगरी कुस्तीमय झाली आहे.

    • Maharashtra kesari wrestling tournament : पुण्यात १० जानेवारी रोजी महाराष्ट्र केसरीचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत तीन महाराष्ट्र केसरी पुन्हा भिडणार आहेत. यामुळे पुणेनगरी कुस्तीमय झाली आहे.

Maharashtra Kesari Prize money : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व संस्कृती प्रतिष्ठान आयोजित ६५ व्या 'महाराष्ट्र केसरी'चा थरार आज मंगळवारपासून (१० जानेवारी) रंगणार आहे. यापूर्वी 'महाराष्ट्र केसरी'चे मानकरी ठरलेले पृथ्वीराज पाटील, बाला रफिक शेख व हर्षवर्धन सदगीर हे तिघे पुन्हा एकदा 'महाराष्ट्र केसरी' होण्यासाठी आखाड्यात उतरणार आहेत. तिघांमधील तुळ्यबळ लढत कुस्तीरसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी ठरणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये राज्यातील ४५ तालीमीतील वेगवेगळ्या १८ वजनी गटात जवळपास ९०० पेक्षा अधिक पैलवान सहभागी होणार आहेत. १४ जानेवारी रोजी संंध्याकाळी 'महाराष्ट्र केसरी'च्या किताबाकरता अंतिम लढत रंगणार आहे.

उद्घाटनाला ऑलिम्पक पदक विजेता योगश्वर दत्त उपस्थित राहणार

स्पर्धेचे मुख्य उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, ऑलिम्पक पदक विजेता योगेश्वर दत्त यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

स्पर्धा कुठे रंगणार?

महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार पुण्याच्या कोथरूडमध्ये रंगणारआहे. या स्पर्धेसाठी ३२ एकरात कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या नावाने भव्य अशी क्रिडा नगरी साकारण्यात आली आहे. यातीलत १२ एकरात ८० हजार आसनक्षमतेचे मैदान, दोन माती आणि तीन गादीचे आखाडे तयार करण्यात आले आहेत.

विजेत्यांवर होणार बक्षिसांचा वर्षाव

'महाराष्ट्र केसरी'च्या विजेत्याला रोख ५ लाखांचे बक्षीस, थार गाडी आणि उपविजेत्याला ट्रॅक्टर व रोख अडीच लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तसेच, विविध १८ वजनी गटातील प्रत्येक विजेत्यावरही बक्षिसाचा वर्षाव होणार आहे. या १८ गटातील विजेत्यांना जावा कंपनीच्या गाड्या देण्यात येणार आहेत. त्यासोबतच कुस्तीपटूंना क्वालिटी किटही देण्यात येणार असल्याचे 'महाराष्ट्र केसरी'चे प्रमुख संयोजक मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.

पुढील बातम्या