मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Cristiano Ronaldo: रोनाल्डो देणार २.५ कोटी भाडे, सौदीमध्ये ‘या’ ठिकाणी राहतोय स्टार फुटबॉलर

Cristiano Ronaldo: रोनाल्डो देणार २.५ कोटी भाडे, सौदीमध्ये ‘या’ ठिकाणी राहतोय स्टार फुटबॉलर

Jan 09, 2023, 01:30 PM IST

    • Cristiano Ronaldo in Al-Nassr: ३७ वर्षीय रोनाल्डोने अल नासरसोबत अडीच वर्षांचा करार केला आहे. तो २०२५ पर्यंत या क्लबसाठी खेळणार आहे.
Cristiano Ronaldo

Cristiano Ronaldo in Al-Nassr: ३७ वर्षीय रोनाल्डोने अल नासरसोबत अडीच वर्षांचा करार केला आहे. तो २०२५ पर्यंत या क्लबसाठी खेळणार आहे.

    • Cristiano Ronaldo in Al-Nassr: ३७ वर्षीय रोनाल्डोने अल नासरसोबत अडीच वर्षांचा करार केला आहे. तो २०२५ पर्यंत या क्लबसाठी खेळणार आहे.

Cristiano Ronaldo kingdom Tower: पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो सध्या त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिनासोबत सौदी अरेबियात आहे. त्याने सौदी अरेबियाच्या अल नासर या फुटबॉल क्लबशी करार केला आहे. रोनाल्डो या क्लबकडून खेळताना दिसणार आहे

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

३७ वर्षीय रोनाल्डोने अल नासरसोबत अडीच वर्षांचा करार केला आहे. तो २०२५ पर्यंत या क्लबसाठी खेळणार आहे. या दरम्यान त्याचा पगार २०० मिलियन युरो (सुमारे १७०० कोटी रुपये) असेल. रोनाल्डो प्रथमच आशियाई क्लबकडून खेळणार आहे. याआधी त्याने जवळपास एक दशक युरोपियन क्लब फुटबॉलवर राज्य केले आहे.

अल-नासरसोबत करार केल्यानंतर रोनाल्डो सध्या आपले कुटुंबिय आणि सहकाऱ्यांसोबत रियाधच्या किंगडम टॉवर येथील एका अत्यंत महागड्या हॉटेलच्या सुईटमध्ये राहत आहे. १७ खोल्यांच्या या हॉटेलचे महिनाभराचे भाडे तब्बल २.५ कोटी रुपये आहे. तो लवकरच रियाध येथे नवीन घर विकत घेणार आहे. मात्र तोपर्यंत त्याला हॉटेलमध्ये भाड्याने राहावे लागणार आहे.

फिफा विश्वचषक २०२२ रोनाल्डोसाठी दुःखद स्वप्न

कतारने नुकताच आयोजित केलेला फिफा विश्वचषक २०२२ हा रोनाल्डो आणि त्याचा संघ पोर्तुगालसाठी दुःखद स्वप्नापेक्षा कमी नव्हता. पोर्तुगालला उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोने १-० ने पराभूत केले. या स्पर्धेत रोनाल्डोला केवळ एकच गोल करता आला. बाद फेरीत त्याला स्टार्टिंग ११ मध्येही स्थान मिळाले नव्हते.

रोनाल्डो हा व्यावसायिक फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. रोनाल्डोने यावर्षी जोसेफ बीकनला (८०५ गोल) मागे टाकले होते. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही रोनाल्डोच्या नावावर आहे. रोनाल्डोने पोर्तुगालसाठी आतापर्यंत १९६ सामन्यांत ११८ गोल केले आहेत.

पुढील बातम्या