मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL Media Rights: बोली ४२ हजार कोटींच्या पुढे, एक सामना १०० कोटी रुपयांचा

IPL Media Rights: बोली ४२ हजार कोटींच्या पुढे, एक सामना १०० कोटी रुपयांचा

Jun 12, 2022, 08:47 PM IST

    • लिलावासाठी १२ कंपन्यांनी निविदा फॉर्म खरेदी केले होते. लिलावात बोली लावण्यासाठी आता ७ कंपन्या या मुख्य शर्यतीत आहेत.
ipl

लिलावासाठी १२ कंपन्यांनी निविदा फॉर्म खरेदी केले होते. लिलावात बोली लावण्यासाठी आता ७ कंपन्या या मुख्य शर्यतीत आहेत.

    • लिलावासाठी १२ कंपन्यांनी निविदा फॉर्म खरेदी केले होते. लिलावात बोली लावण्यासाठी आता ७ कंपन्या या मुख्य शर्यतीत आहेत.

इंडियन प्रीमियर लीगच्या (ipl media rights)) मीडिया हक्कांसाठी लिलावाची प्रक्रिया रविवार १२ जूनपासून सुरू झाली आहे. २०२३ ते २०२७ या कालावधीतील आयपीएल सामन्यांच्या प्रसारण हक्कांसाठी बीसीसीआयने (bcci) ही लिलाव प्रक्रिया आयोजित केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

लिलाव प्रक्रियेच्या पहिल्याच मीडिया राईट्स टीव्ही आणि डिजिटल राइट्ससाठीची बोली ही ४२ हजार कोटींच्या पुढे गेली आहे. म्हणजेच आता एका आयपीएल सामन्याची किंमत १०० कोटींहून अधिक झाली आहे. गेल्या लिलावाच्या तुलनेत पहिल्या दिवशी ही रक्कम अडीच पटीने वाढली असून सोमवारी त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. २०१८ ते २०२२ या कालावधीसाठी १४ कंपन्यांनी आयपीएलच्या प्रसारणाचे अधिकार मिळवण्यासाठी बोली लावली होती. सरतेशेवटी, स्टार इंडियाने १६,३४७.५ कोटी रुपयांची विक्रमी रक्कम भरून प्रसारण हक्क जिंकले होते.

यावेळी मीडिया अधिकार चार श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. पॅकेज A हे भारतीय उपखंडातील टेलिव्हिजन अधिकारांशी संबंधित आहे, तर पॅकेज B डिजिटल स्पेस अधिकारांशी संबंधित आहे. त्याच वेळी, पॅकेज C मध्ये महत्त्वाच्या सामन्यांसाठी विशेष प्रसारणाचे अधिकार समाविष्ट आहेत, तसेच, पॅकेज D मध्ये परदेशातील प्रसारणाचे हक्क समाविष्ट आहेत.

याशिवाय वीकेंड गेम्स, प्लेऑफ आणि फायनलसाठी विशेष श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. या संदर्भात जय शाह म्हणाले की, आयपीएलमध्ये अधिक ब्रॉडकास्टिंग पार्टनर्स असावेत म्हणून असे केले गेले आहे.

लिलावासाठी १२ कंपन्यांनी निविदा फॉर्म खरेदी केले होते. लिलावात बोली लावण्यासाठी आता ७ कंपन्या टेबलवर आहेत. वायाकॉम-रिलायन्स, डिस्ने+हॉटस्टार, सोनी पिक्चर्स, झी ग्रुप, सुपरस्पोर्ट, टाइम्स इंटरनेट, फनएशिया या लिलावात सहभागी आहेत. मीडिया हक्क विकत घेणाऱ्या कंपन्याना २०२३ ते २०२५ या तीन मोसमात प्रत्येकी ७४-७४ सामने मिळवू शकतात. तर आयपीएल २०२६ आणि २०२७ मध्ये सामन्यांची संख्या ९४ पर्यंत पोहोचू शकते.

विभाग

पुढील बातम्या