मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ट्रेन्ट बोल्टची मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी, ६९ कसोटीतच बनवला रेकॉर्ड

ट्रेन्ट बोल्टची मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी, ६९ कसोटीतच बनवला रेकॉर्ड

Jun 12, 2022, 08:19 PM IST

    • मालिकेतील पहिला कसोटी सामना न्युझीलंडने गमावला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.
trent boult

मालिकेतील पहिला कसोटी सामना न्युझीलंडने गमावला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

    • मालिकेतील पहिला कसोटी सामना न्युझीलंडने गमावला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात नॉटिंगहॅम येथे (england vs newzeland nottingham test) मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या डावात न्युझीलंडने ५५३ धावांचा डोंगर उभारला आहे. त्यांच्याकडून डॅरेल मिचेलने (Daryl Mitchell) सर्वाधिक १९० धावांची खेळी केली. यात त्याने ४ षटकार ठोकले, तर टॉम ब्लंडेलने (Tom Blundell) १०६ धावांचे योगदान दिले.मात्र, या दोघांपेक्षा अधिक चर्चेत आला तो ११ व्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला ट्रेन्ट बोल्ट (trent boult).

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

ट्रेन्ट बोल्टने पहिल्या डावात १८ चेंडूत चार चौकारांच्या मदतीने नाबाद १६ धावांची खेळी केली. यासह त्याने श्रीलंकेच्या मुथैय्या मुरलीधरनच्या एका विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. ११ व्या या क्रमांकावर फलंदाजी करताना श्रीलंकेच्या या दिग्गज खेळाडूने ८७ कसोटीत ६२३ धावा केल्या होत्या. मात्र, आता या १८ धावांच्या मदतीने बोल्टने ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना तेवढ्याच धावा केल्या आहेत. बोल्टने ६९ कसोटीत १६.३९ च्या सरासरीने ६२३ धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचाही समावेश आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये ११ व्या क्रमांकावर सर्वाधिक धावा असणारे फलंदाज-

(१) ६२३ - ट्रेंट बोल्ट (न्युझीलंड)

(२) ६२३ - मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)

(३) ६०९ - जेम्स अँडरसन (इंग्लंड)

(४) ६०३ - ग्लेन मॅकग्रॉ (ऑस्ट्रेलिया)

(५) ५५३ - कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज)

दरम्यान, मालिकेतील पहिला कसोटी सामना न्युझीलंडने गमावला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, आता न्युझीलंडचा धावांचा डोंगर पाहता हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आल्याचे दिसत आहे. न्युझीलंडच्या ५५३ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत २ बाद ३१९ धावा झाल्या आहेत. इंग्लंडच्या ओली पोपने शानदार शतक झळकावले आहे. तो १४१ धावांवर खेळत आहे. तर इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट हा शतकाकडे वाटचाल करत असून तो  ९८ धावांवर खेळत आहेत. न्युझीलंडकडून ट्रेन्ट बोल्ट आणि मॅट हेन्री यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला आहे.

विभाग

पुढील बातम्या