मराठी बातम्या  /  क्रीडा  /  टीम इंडियाचा नवा कॅप्टन! २४ व्या वर्षीच अलिशान गाड्या, 'इतक्या' कोटींचा मालक

टीम इंडियाचा नवा कॅप्टन! २४ व्या वर्षीच अलिशान गाड्या, 'इतक्या' कोटींचा मालक

Jun 12, 2022, 07:38 PM IST

    • रिषभ त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही प्रचंड चर्चेत असतो. तो गेल्या काही वर्षांपासून ईशा नेगी हिला डेट करत आहे.
rishabh pant

रिषभ त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही प्रचंड चर्चेत असतो. तो गेल्या काही वर्षांपासून ईशा नेगी हिला डेट करत आहे.

    • रिषभ त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही प्रचंड चर्चेत असतो. तो गेल्या काही वर्षांपासून ईशा नेगी हिला डेट करत आहे.

टीम इंडियाचा (team india) यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत (rishabh pant)  सध्या खूप चर्चेत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी (india vs south africa) भारतीय संघाचे नेतृत्व हे पंतकडे चालून आले आहे. मात्र, रिषभ पंतसाठी कर्णधारपदाची सुरुवात खास झाली नाही. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला पहिल्या T20 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणाऱ्या रिषभ पंतने वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी करोडो रुपयांची संपत्ती जमा केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषभ पंतने २०२० मध्ये २०.१९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर २०२१ मध्ये पंतची एकूण संपत्ती ५ दशलक्ष डॉलर्स इतकी होती. सध्या रिषभ पंतची एकूण संपत्ती ही ८.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ६६.४२ कोटी रुपये इतकी आहे.

पंतचे घरही आलिशान आहे. रिषभ पंत हा यष्टिरक्षक आहे, त्यामुळे त्याला फिटनेसवर अधिक लक्ष द्यावे लागते. त्यामुळे त्याने आपल्या घरात एक छोटीशी जिमही बनवली आहे. रिषभच्या कुटुंबात त्याची बहीण साक्षी आणि आई सरोज यांचा समावेश आहे.

तसेच, रिषभला महागड्या कारची खूप आवड आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये त्याच्याकडे मर्सिडीज, ऑडी ८ आणि फोर्ड या महागड्या कारचा समावेश आहे. या गाड्यांची किंमत करोडोंच्या घरात आहे.

रिषभ त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही प्रचंड चर्चेत असतो. तो गेल्या काही वर्षांपासून ईशा नेगी हिला डेट करत आहे. ईशा नेगी मूळची उत्तराखंडची असून ती व्यवसायाने इंटिरियर डिझायनर आहे. आयपीएल २०२२ मध्येही ईशा नेगी ही स्टेडियममध्ये रिषभला पाठिंबा देण्यासाठी अनेकदा मैदानात दिसली होती. या मालिकेसाठी कर्णधार झाल्यानंतर इशाने रिषभसाठी एक खास मॅसेजही शेअर केला होता.

दरम्यान, आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेपूर्वी केएल राहुलला कर्णधार तर पंतला उपकर्णधार करण्यात आले होते. मात्र केएल राहुल मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वीच दुखापतीमुळे बाहेर झाला. त्यामुळे रिषभ पंतची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. तर हार्दिक पांड्याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

 या सोबतच, या मालिकेसाठी टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. या दोघांशिवाय जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनाही विश्रांती देण्यात आली आहे.

 

पुढील बातम्या