मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Aakash Chopra : कमेंटेटर आकाश चोप्रा कोरोना पॉझिटिव्ह, खेळाडूंमध्ये घबराट!

Aakash Chopra : कमेंटेटर आकाश चोप्रा कोरोना पॉझिटिव्ह, खेळाडूंमध्ये घबराट!

Apr 04, 2023, 03:36 PM IST

  • IPL 2023 Aakash Chopra Covid Positive : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

Akash Chopra

IPL 2023 Aakash Chopra Covid Positive : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

  • IPL 2023 Aakash Chopra Covid Positive : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

Aakash Chopra Covid-19 Positive: भारतात सध्या सर्वत्र आयपीएलची चर्चा सुरु आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत.दरम्यान ही स्पर्धा सुरु असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू, प्रसिद्ध समालोचक आणि क्रिकेट तज्ज्ञ अशी ख्याती असलेले आकाश चोप्रा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. यामुळे पुढील काही दिवस प्रेक्षकांना आकाश चोप्रा यांची कॉमेंट्री ऐकता येणार नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

नुकतेच आकाश चोप्रा यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. "कोरोनाने पुन्हा माझ्यावर हल्ला केला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवली असल्याने मी काही दिवस समालोचन करताना दिसून येणार नाही. घसा खराब झाल्याने आवाजावर परिणाम होऊ शकतो", अशा आशयाचे ट्वीट आकाश चोप्रा यांनी केले आहे. याआधीही आकाश चोप्रा यांना कोरोना लागण झाली होती. त्यावेळी देखील त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली होती.

काश चोप्रा हा प्रसिद्ध भारतीय समालोचक आहे. ते आयपीएल २०२३ स्पर्धेत जिओ सिनेमासाठी हिंदी भाषेत सामालोचन करायचे. मात्र, आता आकाश चोप्रा समालोचन करणार नसल्याने नक्कीच चाहत्यांना त्यांची कमतरता जाणवणार आहे.

महत्वाचे म्हणजे कोरोनाच्या भितीने अनेक खेळाडूंनी गेल्या वर्षी आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता.  याच पार्श्वभूमीवर आकाश चोप्रा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खेळाडूंमध्ये घबराट परसली आहे.

विभाग

पुढील बातम्या