मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sanju Samson: सर्वाधिक धावा करूनही संजू सॅमसन ठरतोय टीकेचा धनी; काय आहे कारण?

Sanju Samson: सर्वाधिक धावा करूनही संजू सॅमसन ठरतोय टीकेचा धनी; काय आहे कारण?

Oct 07, 2022, 01:59 PM IST

    • IND vs SA 2022: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्वाधिक धावा करूनही भारताचा फलंदाज संजू सॅमसन एका चुकीमुळं टीकेचा धनी ठरला आहे.
Sanju Samson

IND vs SA 2022: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्वाधिक धावा करूनही भारताचा फलंदाज संजू सॅमसन एका चुकीमुळं टीकेचा धनी ठरला आहे.

    • IND vs SA 2022: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्वाधिक धावा करूनही भारताचा फलंदाज संजू सॅमसन एका चुकीमुळं टीकेचा धनी ठरला आहे.

IND vs SA 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एक दिवसीय सामन्यात काल झालेला भारताचा पराभव क्रिकेटरसिकांच्या मनाला चुटपूट लावणारा ठरला. सुरुवातीचे चार फलंदाज झटपट बाद झाल्यानंतरही हा सामना भारताच्या हातात होता आणि संजू सॅमसन शेवटपर्यंत खेळपट्टीवर होता. मात्र, तरीही सामना जिंकता आला नाही. त्यामुळं सर्वाधिक धावा करूनही आता संजू सॅमसन टीकेचा धनी ठरला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

लखनऊ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाहुण्या संघानं प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी २५० धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. सॅमसन आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाला निर्धारित ४० षटकात ८ विकेट गमावून२४० धावाच करता आल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना संजू सॅमसननं शेवटच्या काही षटकांमध्ये एक चूक केली, ती चूक भारताला महागात पडल्याचं बोललं जात आहे.

शिखर धवन (४) आणि शुभमन गिल (३) हे दोन्ही सलामीवीर सहा षटकांतच पॅव्हेलियनमध्ये परतले असताना व भारतानं ५१ धावांवर आघाडीचे ४ फलंदाज गमावले असताना सामन्यात परत येणं सोपं नव्हतं. मात्र, सॅमसननं जबरदस्त फलंदाजी करत शेवटच्या षटकापर्यंत सामना खेचून आणला होता. त्याला श्रेयस अय्यरनं चांगली साथ दिली. पण ३९ व्या षटकात सॅमसननं एक चूक केली, ज्याचा फटका भारताला सहन करावा लागला. खरंतर शेवटच्या दोन षटकांमध्ये टीम इंडियाला विजयासाठी ३७ धावांची गरज होती. ३८ व्या षटकात भारताला केवळ ८ धावा मिळाल्या. 

आधीच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सॅमसनचा फटका फसला होता. त्यामुळं ३९व्या षटकात आलेला आवेश खान रबाडाच्या पहिल्या चेंडूचा सामना करत होता. रबाडानं अप्रतिम गोलंदाजी करत पहिले दोन चेंडू निर्धाव टाकले. तिसरा चेंडू आवेश खानच्या बॅटला लागला, त्यावेळी सॅमसनला स्ट्राइक बदलण्याची उत्तम संधी होती. तिथं एक धाव घेऊन सॅमसनला पुढील तीन चेंडूंचा फायदा घेता आला असता, पण सॅमसननं त्या चेंडूवर एका ऐवजी दोन धावा घेत नवव्या क्रमांकाचा फलंदाज आवेश खानला पुन्हा स्ट्राइक दिली. सॅमसननं हीच सर्वात मोठी चूक केली. पहिल्या तीन चेंडूंमध्ये दोन धावा केल्यानंतर भारताला पुढच्या तीन चेंडूंमध्ये केवळ ५ धावाच करता आल्या. त्यामुळं अखेरच्या षटकात भारताला ३० धावांची गरज होती. सॅमसननं रबाडाचे शेवटचे तीन चेंडू खेळले असते तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं. विशेष म्हणजे, रबाडानं आपल्या षटकातील शेवटचा चेंडू नो बॉल टाकला होता. त्याचाही फायदा संजू सॅमसनला घेता आला असता. शेवटच्या षटकात सॅमसननं तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं २० धावा जमवल्या खऱ्या, पण सामना ९ धावांनी गमवावा लागला.

पुढील बातम्या