मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Kuldeep Yadav Hat-Trick: कुलदीप यादवनं घेतली हॅट्ट्रिक, वनडेमध्ये चौथ्यांदा केली अशी कामगिरी

Kuldeep Yadav Hat-Trick: कुलदीप यादवनं घेतली हॅट्ट्रिक, वनडेमध्ये चौथ्यांदा केली अशी कामगिरी

Sep 25, 2022, 02:50 PM IST

    • Kuldeep Yadav Hat-Trick: चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने न्यूझीलंड-अ विरुद्ध शानदार गोलंदाजी करताना हॅटट्रिक घेतली आहे. कुलदीपने यापूर्वी एकदिवसीय सामन्यांमध्ये दोनदा हॅट्ट्रिक घेतली आहे. 
Kuldeep Yadav

Kuldeep Yadav Hat-Trick: चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने न्यूझीलंड-अ विरुद्ध शानदार गोलंदाजी करताना हॅटट्रिक घेतली आहे. कुलदीपने यापूर्वी एकदिवसीय सामन्यांमध्ये दोनदा हॅट्ट्रिक घेतली आहे.

    • Kuldeep Yadav Hat-Trick: चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने न्यूझीलंड-अ विरुद्ध शानदार गोलंदाजी करताना हॅटट्रिक घेतली आहे. कुलदीपने यापूर्वी एकदिवसीय सामन्यांमध्ये दोनदा हॅट्ट्रिक घेतली आहे. 

न्यूझीलंड-अ आणि भारत-अ यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु आहे. मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने हॅटट्रिक घेतली आहे. कुलदीपच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे भारत-अ संघाने किवींना केवळ २१९ धावांत गुंडाळले. दरम्यान, टी-20 विश्वचषकासाठी कुलदीपचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्याने आपल्या कामगिरीने निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

कुलदीपने अशी घेतली हॅटट्रिक

कुलदीपने डावाच्या ४७ व्या षटकात हॅट्ट्रिक घेतली. प्रथम त्याने चौथ्या चेंडूवर लोगान व्हॅन बीकला पृथ्वी शॉकरवी झेलबाद केले. त्यानंतर पुढच्या चेंडूवर कुलदीपने जो वॉकरला बाद केले. वॉकरचा झेल कर्णधार संजू सॅमसनने टिपला. शेवटच्या चेंडूवर कुलदीपने जेकब डफीला एलबीडब्ल्यू करून हॅट्ट्रिक साधली. कुलदीपने १० षटकात ५१ धावा देत ४ बळी घेतले.

रचिन रवींद्र आणि जो कार्टर यांनी सावरला न्युझीलंडचा डाव

नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या किवीजची सुरुवात खराब झाली आणि ३२ धावांच्या स्कोअरवर त्यांची पहिली विकेट गेली. त्यानंतर रचिन रवींद्र आणि जो कार्टर यांनी शानदार खेळी करत न्यूझीलंडला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यास मदत केली. रवींद्रने ६५ चेंडूत ६१ धावा केल्या. ज्यात ९ चौकारांचा समावेश आहे. त्याचवेळी जो कार्टरने ३ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने सर्वाधिक ७२ धावा केल्या. इंडिया-अ कडून कुलदीपशिवाय ऋषी धवन आणि राहुल चहरने शानदार खेळ दाखवत प्रत्येकी २ बळी घेतले.

कुलदीप यादवची चौथी हॅट्ट्रिक

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुलदीपच्या नावावर दोन एकदिवसीय हॅटट्रिक आहेत. २०१७ मध्ये त्याने कोलकाता येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. यानंतर त्याने २०१९ मध्येही वेस्ट इंडिजविरुद्ध असाच पराक्रम केला होता. आता पुन्हा एकदा त्याने हॅटट्रिक नोंदवली आहे. मात्र, या हॅट्ट्रिकची गणना लिस्ट ए क्रिकेटमध्ये केली जाईल.

दरम्यान, त्याने अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये पहिली हॅट्ट्रिक घेतली होती. १९ वर्षांखालील विश्वचषकात स्कॉटलंडविरुद्ध त्याने हॅट्ट्रिक साधली. अशा परिस्थितीत, असे म्हणता येईल की आता त्याच्या खात्यात एकूण ४ हॅटट्रिक झाल्या आहेत. त्यापैकी दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्या आहेत.

पुढील बातम्या