मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rahul Dravid: राहुल द्रविडचीही हकालपट्टी होणार? टी-20 साठी परदेशी कोच असणार

Rahul Dravid: राहुल द्रविडचीही हकालपट्टी होणार? टी-20 साठी परदेशी कोच असणार

Dec 29, 2022, 02:17 PM IST

    • Team India New Coach for T20 cricket: भारतीय क्रिकेट संघात लवकरच स्प्लिट कोचिंग फॉर्म्युला लागू केला जाऊ शकतो. म्हणजेच राहुल द्रविड कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रशिक्षक म्हणून कायम राहू शकतो. तर T20 मध्ये कोणत्या तरी परदेशी खेळाडूला प्रशिक्षक बनवले जाईल.
Rahul Dravid

Team India New Coach for T20 cricket: भारतीय क्रिकेट संघात लवकरच स्प्लिट कोचिंग फॉर्म्युला लागू केला जाऊ शकतो. म्हणजेच राहुल द्रविड कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रशिक्षक म्हणून कायम राहू शकतो. तर T20 मध्ये कोणत्या तरी परदेशी खेळाडूला प्रशिक्षक बनवले जाईल.

    • Team India New Coach for T20 cricket: भारतीय क्रिकेट संघात लवकरच स्प्लिट कोचिंग फॉर्म्युला लागू केला जाऊ शकतो. म्हणजेच राहुल द्रविड कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रशिक्षक म्हणून कायम राहू शकतो. तर T20 मध्ये कोणत्या तरी परदेशी खेळाडूला प्रशिक्षक बनवले जाईल.

Rahul Dravid Team India Coach: बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा केली. या दरम्यान BCCI ने अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांना विश्रांती देऊन हार्दिक पांड्याकडे टी-20 कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर सूर्यकुमार यादवला उपकर्णधार करण्यात आले. अशा परिस्थितीत आता संघाच्या कोचबाबतही लवकरच मोठा निर्णय घेतला जावू शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

भारताचा माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविडला भारतीय टी-२० संघाच्या प्रशिक्षकपदावरून मुक्त केले जाऊ शकते. याचे मोठे कारण म्हणजे टीम इंडियाने अलीकडच्या काळात मर्यादित षटकांच्या (ODI आणि T20) फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केलेली नाही. टी-20 फॉरमॅटमध्ये परदेशी अनुभवी खेळाडूला भारतीय संघाचे प्रशिक्षक बनवले जाऊ शकते.

इनसाईड स्पोर्ट्सच्या एका रिपोर्टनुसार, द्रविडच्या जागी टी-20 साठी विदेशी कोचची निवड केली जावू शकते. विशेष म्हणजे, लवकरच क्रिकेट सल्लागार समितीकडून (CAC) मंजुरी घेऊन अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. इनसाइटस्पोर्टने सूत्रांच्या हवाल्याने हा दावा केला आहे.

टीम इंडियात स्प्लिट कोचिंग फॉर्म्युला

भारतीय क्रिकेट संघात लवकरच स्प्लिट कोचिंग फॉर्म्युला लागू केला जाऊ शकतो. म्हणजेच राहुल द्रविड कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रशिक्षक म्हणून कायम राहू शकतो. तर T20 मध्ये कोणत्या तरी परदेशी खेळाडूला प्रशिक्षक बनवले जाईल.

परदेशी प्रशिक्षकाबाबत बोलताना बीसीसीआयच्या सुत्रांनी सांगितले की, “आमच्या तत्त्वांनुसार चालणारा परदेशी प्रशिक्षक मिळाल्यास त्याला नक्कीच संधी दिली जाईल”.

दरम्यान, असे झाले तर ७ वर्षांनंतर भारताला विदेशी कोच मिळेल. याआधी २०१५ च्या विश्वचषकात डंकन फ्लेचर हे टीम इंडियाचे कोच होते.

पुढील बातम्या