मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 VIDEO : फिल्डिंगच्या घाईत चक्क उलटी पँट घातली, वृद्धिमान साहा सोबत नेमकं काय घडलं, पाहा VIRAL VIDEO

IPL 2023 VIDEO : फिल्डिंगच्या घाईत चक्क उलटी पँट घातली, वृद्धिमान साहा सोबत नेमकं काय घडलं, पाहा VIRAL VIDEO

May 08, 2023, 06:28 PM IST

    • IPL 2023 VIRAL VIDEO : लखनौविरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातचा विकेटकीपर वृद्धिमान साहा उलटी पँट घालून आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Wriddhiman Saha VIRAL VIDEO (HT)

IPL 2023 VIRAL VIDEO : लखनौविरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातचा विकेटकीपर वृद्धिमान साहा उलटी पँट घालून आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

    • IPL 2023 VIRAL VIDEO : लखनौविरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातचा विकेटकीपर वृद्धिमान साहा उलटी पँट घालून आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Wriddhiman Saha VIRAL VIDEO : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सने मोठा विजय मिळवत आयपीएलच्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. शुभमन गिल, हार्दिक पांड्या, वृद्धिमान साहा आणि राशिद खान यांच्या कामगिरीमुळं गुजरातने आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. त्यातच आता लखनौविरुद्ध झालेल्या सामन्यात गुजराच्या संघासोबत अनोखा प्रकार घडला आहे. पहिली इनिंग संपल्यानंतर क्षेत्ररक्षणाच्या घाईघाईत यष्टिरक्षक ऋद्धिमान साहा उलटी पँट घालून मैदानात आल्याची घटना समोर आली आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

गुजरातची बॅटिंग संपल्यानंतर लखनौचे खेळाडू फलंदाजीसाठी आले. त्यावेळी वृद्धिमान साहाने फिल्डिंगच्या घाईत चक्क उलटी ट्रॅक पँट घातली. सुरुवातीला हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही. परंतु पंचांनी साहाला पाहिल्यानंतर त्यांना त्याची पँट उलटी असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर साहा तातडीने पव्हेलियनच्या दिशेने रवाना झाला. या घटनेचा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

ड्रेसिंग रुममध्ये जेवण केल्यानंतर औषधं घ्यायची होती, त्याचवेळी साहाला इंजेक्शन देण्यात येणार होती. परंतु फिल्डिंगला येण्याच्या घाईत वृद्धिमान साहाला उलटी पँट घातल्याचंही लक्षात आलं नाही. एक ते दोन ओव्हरमध्ये यष्टीरक्षण केल्यानंतर तो पँट बदलण्यासाठी मैदानाबाहेर गेला. त्याच्याजागी केएस भरतने यष्टीरक्षण केलं. तत्पुर्वी वृद्धिमान साहाने गुजरातकडून सलामीला येत लखनौच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. साहाने ४३ चेंडूत ८१ धावांची खेळी करत गुजरातच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे.

पुढील बातम्या