मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Fathers Day: अर्जुननं वडिलांसाठी बनवली खास डिश, सचिनचं भावूक ट्वीट

Fathers Day: अर्जुननं वडिलांसाठी बनवली खास डिश, सचिनचं भावूक ट्वीट

Jun 19, 2022, 08:21 PM IST

    • सचिननेही आपल्या वडिलांसाठी एक पोस्ट शेअर केली होती.
sachin (instagram, sachin tendulkar)

सचिननेही आपल्या वडिलांसाठी एक पोस्ट शेअर केली होती.

    • सचिननेही आपल्या वडिलांसाठी एक पोस्ट शेअर केली होती.

वडिलांप्रती असलेले आपले प्रेम आणि आदर दर्शवण्यासाठी दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी १९ जून म्हणजेच आज फादर्स डे साजरा केला जात आहे. आज अनेक सेलिब्रेटींनी हा दिवस खास बनवला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

फादर्स डेच्या निमित्ताने माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने हा दिवस खास बनवला आहे. अर्जुनने त्याच्या वडिलांसाठी आजच्या दिवशी एक खास डीश बनवली होती. त्याचा आस्वाद घेऊन सचिनने आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. यावेळी सचिनने एक भावूक ट्वीट केले आहे.

सचिन म्हणाला की, “आज अर्जुनने बनवलेले स्क्रॅम्बल्ड एग्ज हे सर्वोत्तम होते. त्याचा पोत आणि चव खूप चांगली होती! त्यात त्याचे प्रेम आहे, यापेक्षा मौल्यवान काय असू शकते,”

याआधी सचिननेही आपल्या वडिलांसाठी एक पोस्ट शेअर केली होती. “प्रत्येक मुलासाठी त्याचे वडिल हे त्याचे प्रथम हिरो असतात. माझे वडिलही माझे हिरो आहेत. त्यांची शिकवण मला नेहमी आठवणीत राहिल. त्यांचे निस्वार्थ प्रेम आणि मार्गदर्शन मला नेहमी आठवते. सर्वांना फादर्स डेच्या शुभेच्छा!”,

दरम्यान, फादर्स डे हा दिवस १९१० पासून साजरा करण्यास सुरुवात झाली. वॉशिंग्टन शहरात राहणाऱ्या सोनोरा या मुलीच्या आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी तिला आईप्रमाणेच प्रेमाने वाढवले. त्यामुळे सोनोराचाही तिच्या वडिलांवर खूप जीव होता. त्यानंतर सोनोराने १९ जून १९१० रोजी पहिल्यांदा फादर्स डे साजरा केला होता.

पुढील बातम्या