मराठी बातम्या  /  क्रीडा  /  बुद्धिबळ ऑलिम्पियाड: पंतप्रधान मोदींच्या हस्ते टॉर्च रिलेचा शुभारंभ

बुद्धिबळ ऑलिम्पियाड: पंतप्रधान मोदींच्या हस्ते टॉर्च रिलेचा शुभारंभ

Jun 19, 2022, 09:28 PM IST

    • यंदा भारतात ४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन होणार असल्याने साऱ्या जगाच्या नजरा याकडे लागल्या आहेत.
pm modi

यंदा भारतात ४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन होणार असल्याने साऱ्या जगाच्या नजरा याकडे लागल्या आहेत.

    • यंदा भारतात ४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन होणार असल्याने साऱ्या जगाच्या नजरा याकडे लागल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी टॉर्च रिलेचा शुभारंभ केला. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये एका रंगारंग कार्यक्रमात या रिले टॉर्चचे लाँचिंग करण्यात आले, या वेळी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर देखील उपस्थित होते.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

बुद्धिबळ ऑलिम्पियाडपूर्वी अशा प्रकारची टॉर्च रिले काढण्याची ही पहिलीच घटना आहे. आतापर्यंत हे फक्त ऑलिम्पिक खेळांमध्येच होत असे, परंतु यावेळी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मंडळाने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्येही याची अंमलबजावणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२० मधील सुवर्णपदक विजेती कोनेरू हम्पी सोबत बुद्धिबळ खेळून स्पर्धेला सुरुवात केली.

या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, "भारत पहिल्यांदाच या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. आम्हाला अभिमान आहे की, हा खेळ आपल्या जन्मभूमीतून पुढे निघून संपूर्ण जगात आपली छाप सोडत आहे. आज बुद्धिबळ पुन्हा आपल्या जन्मभूमीत परत आले आहे".

दरम्यान, यंदा भारतात ४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन होणार असल्याने साऱ्या जगाच्या नजरा याकडे लागल्या आहेत. ही स्पर्धा २८ जुलैपासून चेन्नई येथे सुरू होणार आहे. या स्पर्धेपूर्वी नवी दिल्लीत ऑलिम्पियाड टॉर्च रिले सुरू होत आहे.

दिल्लीपासून सुरू झाल्यानंतर ४० दिवसांच्या कालावधीत ही मशाल देशातील ७५ वेगवेगळ्या शहरांमधून जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी त्या राज्यातील बुद्धिबळ ग्रँडमास्टर्सना ही मशाल मिळणार आहे. अखेर २७ जुलैला मशाल महाबलीपुरमला पोहोचेल. त्यानंतर २८ जुलैपासून बुद्धिबळ ऑलिम्पियाड सुरू होईल. बुद्धिबळ ऑलिम्पियाड १० ऑगस्ट २०२२ पर्यंत चालेल.

विभाग

पुढील बातम्या