मराठी बातम्या  /  क्रीडा  /  श्रीलंका संकटात! लोकांचे प्रचंड हाल, पेट्रोल पंपावर चहा वाटतोय दिग्गज क्रिकेटपटू

श्रीलंका संकटात! लोकांचे प्रचंड हाल, पेट्रोल पंपावर चहा वाटतोय दिग्गज क्रिकेटपटू

Jun 19, 2022, 07:16 PM IST

    • रोशन महानामाने श्रीलंकेसाठी ५२ कसोटी आणि २१३ वन-डे सामने खेळले आहेत.
roshan mahanama (social media)

रोशन महानामाने श्रीलंकेसाठी ५२ कसोटी आणि २१३ वन-डे सामने खेळले आहेत.

    • रोशन महानामाने श्रीलंकेसाठी ५२ कसोटी आणि २१३ वन-डे सामने खेळले आहेत.

श्रीलंकेला १९४८ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर पहिल्यांदाच श्रीलंकेला सर्वात वाईट आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीपासून देशात अन्न, औषधे आणि इंधन यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई जाणवत आहे. महागाईनेही विक्रमी उच्चांक गाठला असून आहे. विजेचे तीव्र संकट निर्माण झाले आहे. या सर्व प्रकारामुळे देशाचे अध्यक्ष गोटाबाया राजपाक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला होता.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

या सर्व संकटांच्या काळात श्रीलंकेच्या एका महान क्रिकेटपटूचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोशन महानामा असे त्या क्रिकेटपटूचे नाव आहे. महानामा १९९६ मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य आहे. रोशन महानमाने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केली आहेत. ट्विटरवर पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये तो पेट्रोल पंपाबाहेर रांगेत उभ्या असलेल्या लोकांना चहा देताना दिसत आहे. हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

महानामाने ट्विटरवर पोस्ट केलेल्या फोटोंसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'आम्ही कम्युनिटी फूड शेयरिंग टीमसोबत आज वॉर्ड प्लेस आणि विजेरामा मावथाभोवती असलेल्या पेट्रोल पंपाबाहेर रांगेत उभ्या असलेल्या लोकांना चहा आणि बन वाटप केले. दिवसेंदिवस ही लाईन लांबत चालली असून या लाईनमध्ये उभ्या असलेल्या लोकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे".

सोबतच पुढे लिहिले की, "कृपया, इंधनासाठी रांगेत उभे असलेल्या लोकांनी एकमेकांची काळजी घ्यावी. सोबत पुरेसे अन्न आणि पाणी घेऊन यावे. जर तुमची प्रकृती ठीक नसेल तर कृपया तुमच्या जवळच्या व्यक्तीशी संपर्क साधा आणि मदतीसाठी विचारा, किंवा १९९० वर कॉल करा. या कठीण काळात एकमेकांची काळजी घेणे गरजेचे आहे".

रोशन महानामाची क्रिकेट कारकिर्द-

३१ मे १९६६ रोजी कोलंबोत जन्मलेल्या रोशन महानामाने श्रीलंकेसाठी ५२ कसोटी आणि २१३ वन-डे सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ४ शतके आणि ११ अर्धशतकांच्या सहाय्याने २ हजार ५७६ धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४ शतके आणि ३५ अर्धशतकांच्या मदतीने ५ हजार १६२ धावा केल्या आहेत. १९९६ च्या विश्वचषक विजेत्या श्रीलंकन क्रिकेट संघाचा रोशन महानमा हे भाग होते. १९९९ च्या विश्वचषकानंतर महानमाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

पुढील बातम्या