मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Gujarat Titans : विराट-डिव्हिलियर्सला पछाडत गुजरातच्या मिलरची बाजी; विस्फोटक खेळी करत रचला विक्रम

Gujarat Titans : विराट-डिव्हिलियर्सला पछाडत गुजरातच्या मिलरची बाजी; विस्फोटक खेळी करत रचला विक्रम

Apr 18, 2023, 07:29 PM IST

    • David Miller In IPL 2023 : यंदाच्या आयपीएलची धडाकेबाज फलंदाजीने सुरुवात करत गुजरातच्या डेव्हिड मिलरने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
David Miller In IPL 2023 (PTI)

David Miller In IPL 2023 : यंदाच्या आयपीएलची धडाकेबाज फलंदाजीने सुरुवात करत गुजरातच्या डेव्हिड मिलरने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

    • David Miller In IPL 2023 : यंदाच्या आयपीएलची धडाकेबाज फलंदाजीने सुरुवात करत गुजरातच्या डेव्हिड मिलरने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Gujarat Titans In IPL 2023 : गतविजेत्या गुजरात टायटन्ससाठी यंदाच्या आयपीएल हंगामाची सुरुवात चांगली राहिलेली आहे. शुभमन गिल, हार्दिक पांड्या, वृद्धिमान साहा आणि डेव्हिड मिलर यांच्यासारखे अनेक खेळाडू फॉर्मात पतरल्यामुळं संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून गुजरातने आयपीएलच्या ट्रॉफीवर दावा ठोकला आहे. याशिवाय गोलंदाजीतही नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात येत असल्यामुळं यंदाच्या आयपीएलवर गुजरातची दावेदारी पक्की असल्याचं मानलं जात आहे. परंतु आता गुजरातच्या मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलरने विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सला मागे टाकत एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्यामुळं आता त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

पंजाबने १५३ धावांचं लक्ष्य दिल्यानंतर गुजरातने १९.५ षटकांत विजय मिळवला. राहुल तेवतिया आणि डेव्हिड मिलरने अखेरच्या षटकांत धुंवाधार खेळी करत गुजरातला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. गुजरातला विजय मिळवून देताना डेव्हिड मिलर नाबाद राहिला. त्यामुळं आयपीएलमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वात जास्त वेळा नाबाद राहण्याचा विक्रम डेव्हिड मिलरने आपल्या नावावर केला आहे. विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि सुरेश रैना यांचा विक्रम मोडत डेव्हिड मिलरने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. धावांचा पाठलाग करताना नाबाद राहणाऱ्या फलंदाजांच्या यादीत डेव्हिड मिलर सहाव्या क्रमांकावर आला आहे. या यादीत रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, युसूफ पठान आणि ड्वेन ब्रावो यांचा समावेश आहे.

SRH vs MI IPL 2023 : हैदराबादने टॉस जिंकला, मुंबईची प्रथम फलंदाजी

आयपीएलमधील सर्वात चांगला फिनीशर...

डेव्हिड मिलर यापूर्वी राजस्थान आणि पंजाबकडून खेळला होता. त्यावेळी देखील त्याला मधल्या फळीत फलंदाजी करत फिनीशरचा रोल देण्यात आला होता. त्यानंतर आता गुजरात टायटन्सनेही मिलरला मधल्या फळीत कायम ठेवलं आहे. त्यानंतर आयपीएलच्या अनेक सामन्यांमध्ये डेव्हिड मिलरने मधल्या फळीत फलंदाजीसाठी येताना विस्फोटक खेळी केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळं आता आयपीएलमध्ये मिलरने सर्वात जास्त वेळा धावांचा पाठलाग करताना नाबाद राहण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

पुढील बातम्या