मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CSK vs GT Pitch Report : फिरकीची जादू चालणार की धावांचा पाऊस पडणार? फायनलसाठी अशी असेल अहमदाबादची पीच

CSK vs GT Pitch Report : फिरकीची जादू चालणार की धावांचा पाऊस पडणार? फायनलसाठी अशी असेल अहमदाबादची पीच

May 27, 2023, 10:39 PM IST

    • csk vs gt ipl final 2023 pitch report : ipl 2023 चा अंतिम सामना २८ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
CSK vs GT Pitch Report

csk vs gt ipl final 2023 pitch report : ipl 2023 चा अंतिम सामना २८ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

    • csk vs gt ipl final 2023 pitch report : ipl 2023 चा अंतिम सामना २८ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

CSK vs GT, Indian Premier League Final : आयपीएल 2023 चा अंतिम सामना २८ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात खेळवला जाणार आहे. या आयपीएल मोसमाची सुरुवातही दोन्ही संघांमधील सामन्यानेच झाली होती. यानंतर क्वालिफायर 1 सामनाही चेन्नई आणि गुजरात यांच्यात खेळला गेला. आता हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात पुन्हा आमनेसामने येणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर GT आणि CSK आतापर्यंत फक्त एकदाच आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये गुजरातने विजय मिळवला आहे. आता रविवारी आयपीएल फायनलमध्ये या दोन संघांमधील आणखी एक रोमांचक लढत अपेक्षित आहे.

अहमदाबादची खेळपट्टी

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग मानली जाते. येथील सपाट खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे आहे. या मैदानावर फलंदाज खूप धावा करतात. शुभमन गिलने हे गेल्या सामन्यात हे सिद्ध केले आहे. अहमदाबादच्या खेळपट्टीवर एकसमान उसळी आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना थोडीशी मदत मिळते. आउटफिल्ड देखील खूप वेगवान आहे. आयपीएल 2023 मध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांची सरासरी धावसंख्या १८७ आहे. या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावेल. नाणेफेक जिंकणारा संघ येथे प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देतो आणि जिंकतो, हे आतापर्यंत तरी दिसून आले आहे.

अहमदाबादचे हवामान

२८ मे रोजी अहमदाबादमधील हवामान क्रिकेटसाठी ((ipl final 2023 ahmedabad weather report)) अनुकूल असण्याची शक्यता आहे. Accuweather नुसार, तापमान ३५ ते ४० अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आयपीएल फायनलच्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता नाही.

पुढील बातम्या