मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Mohammed Shami : मोहम्मद शमीला न्यायालयाचा दणका; पत्नीला महिन्याला १ लाख ३० हजारांची पोटगी देण्याचे आदेश

Mohammed Shami : मोहम्मद शमीला न्यायालयाचा दणका; पत्नीला महिन्याला १ लाख ३० हजारांची पोटगी देण्याचे आदेश

Jan 24, 2023, 07:58 AM IST

    • Cricketer Mohammed Shami: क्रिकेटपटू मोहम्मद शमीला कोलकाता न्यायालयानं चांगलाच दणका दिला आहे. त्याला कोर्टानं पत्नी हसीन जहाँला दर महा १ लाख ३० हजारांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.
Mohammed Shami

Cricketer Mohammed Shami: क्रिकेटपटू मोहम्मद शमीला कोलकाता न्यायालयानं चांगलाच दणका दिला आहे. त्याला कोर्टानं पत्नी हसीन जहाँला दर महा १ लाख ३० हजारांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.

    • Cricketer Mohammed Shami: क्रिकेटपटू मोहम्मद शमीला कोलकाता न्यायालयानं चांगलाच दणका दिला आहे. त्याला कोर्टानं पत्नी हसीन जहाँला दर महा १ लाख ३० हजारांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला कोलकता न्यायालयानं चांगलाच दणका दिला आहे. न्यायालयानं त्याची पत्नी हसीन जहाँ हिला दरमहा तब्बल १ लाख ३० लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आशिया चषकात भारतीय संघानं पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर, शमीची पत्नी हसीन जहाँनं सोशल मीडियावर हार्दिक पांड्याचा फोटो शेअर केला त्या माध्यमातून तिने शामीवर निशाणा साधला होता. दोघांचे संबंध हे ताणले गेले होते. यामुळे तिने त्याच्यापासून फारकत घेत घटस्फोट घेतला होता.

 हसीन हिने पोटगीसाठी २०१८ मध्ये कोर्टात केस दाखल करत तब्बल १००लाख रुपयांच्या मासिक पोटगीची मागणी केली होती. यातील ७ लाख रुपये तिची वैयक्तिक पोटगी आणि उर्वरित तीन लाख रुपये तिच्या मुलीच्या देखभालीसाठी खर्च केले जातील असे कोर्टाने सांगितले होते. 

शामीचे वार्षिक वेतन हे २०२०-२१ मध्ये सर्वाधिक होते. त्यानुसार या पोटगीची मागणी करण्यात आल्याची माहिती हसीनच्या वकील मृगांका मिस्त्री यांनी न्यायालयाला दिली. शमीचे या काळात वार्षिक उत्पन्न तब्बल ७ कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. 

मोहम्मद शामीचे वकील सेलिम रहमान यांनी देखील कोर्टात युक्तिवाद केला. त्यांनी म्हटले की, हसीन जहाँ स्वतः व्यावसायिक फॅशन मॉडेल म्हणून काम करते. तिचे स्वत:चे उत्पन्न असून तिने पोटगी मागणे चुकीचे आहे. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर शमीला हसीन हिला दरमहा १ लाख ३० हजार रुपये पोटगी देण्यास सांगितले. यातील ५० हजार रक्कम ही हसीनला तर उर्वरित रक्कम ही टीच्या मुलीसाठी दिली जाणार आहे. कोर्टाच्या या निकाला बाबत हसीनने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

विभाग

पुढील बातम्या