मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Marcus Stoinis: स्टोईनीसचं १७ चेंडूत अर्धशतक! फिंचची समंजस खेळी; वर्ल्डकपमध्ये कांगारूंचा पहिला विजय

Marcus Stoinis: स्टोईनीसचं १७ चेंडूत अर्धशतक! फिंचची समंजस खेळी; वर्ल्डकपमध्ये कांगारूंचा पहिला विजय

Oct 25, 2022, 08:04 PM IST

    • T20 World Cup Australia Vs Sri Lanka highlights:  ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा ७ विकेट्सने पराभव करत वर्ल्डकपमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतर श्रीलंकेविरुद्धही कांगारू संघ अडचणीत दिसत होता, मात्र मार्कस स्टॉइनिसने तुफानी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.
Marcus Stoinis

T20 World Cup Australia Vs Sri Lanka highlights: ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा ७ विकेट्सने पराभव करत वर्ल्डकपमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतर श्रीलंकेविरुद्धही कांगारू संघ अडचणीत दिसत होता, मात्र मार्कस स्टॉइनिसने तुफानी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

    • T20 World Cup Australia Vs Sri Lanka highlights:  ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा ७ विकेट्सने पराभव करत वर्ल्डकपमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतर श्रीलंकेविरुद्धही कांगारू संघ अडचणीत दिसत होता, मात्र मार्कस स्टॉइनिसने तुफानी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

Cricket Score (AUS vs SL) Australia vs Sri Lanka T20 World Cup: T20 विश्वचषक २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाने त्यांच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ऑस्ट्रेलियासमोर १५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ३ गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या १६.३ षटकांत हे लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टोईनीसने अवघ्या १७ चेंडूत अर्धशतक ठोकले.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

तत्पूर्वी, श्रीलंकेच्या १५८ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. सलामीवी डेव्हिड वॉर्नर १० चेंडूत ११ धावा करुन बाद झाला. दुसरा सलामीवीर आणि कर्णधार शेवटपर्यंत खेळपट्टीवर होता. मात्र, त्याला मोठे फटके खेळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे तो ४२ चेंडू खेळून अवघ्या ३१ धावा करु शकला. या खेळीत त्याने केवळ एकच षटकार ठोकला.

मात्र, त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि त्यानंतर आलेल्या मार्कस स्टोईनीसने श्रीलंकन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. स्टॉयनिसने १७ चेंडूत अर्धशतक ठोकत विजय साकार केला. त्याने १८ चेंडूत नाबाद ५९ धावा चोपल्या. स्टॉईनिसने आपली खेळी ६ षटकार आणि ४ चौकार मारत सजवली. तर मॅक्सवेलने १२ चेंडूत २३ धावा चोपून विजयाला हातभार लावला. लंकेकडून तिक्षाणा, करूणारत्ने आणि धनंजय डि सेल्वाने प्रत्येकी १ विकेट घेतली.

श्रीलंकेचा डाव-

टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली. आशिया चषक चॅम्पियन संघाला पहिला झटका बसला तो ६ धावांवर. मात्र, त्यानंतर धनंजय डी सिल्वा आणि पाथून निशांकाने दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली.

श्रीलंकेसाठी सलामीवीर पथुम निसांकाने ४५ चेंडूत ४० धावा केल्या. तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या धनंजय डी सिल्वाने २६ धावा केल्या. श्रीलंकेचा सलामीवीर कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे आणि कर्णधार दाशून शनाका स्वस्तात बाद झाले. कुसल मेंडिस, भानुका आणि शनाका अनुक्रमे ५, ७ आणि ३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले.

शेवटी चरित असलंका (२५ चेंडूत ३८ धावा) आणि चमिका करुणारत्ने (७ चेंडूत १४ धावा) यांनी झटपट धावा करत संघाची धावसंख्या सहा बाद १५७ पर्यंत नेली. तर ऑस्ट्रेलियाकडून वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने ४ षटकांत २६ धावांत १ बळी घेतला. त्याचवेळी अॅस्टन अगरने ४ षटकात २५ धावांवर १ खेळाडूला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मार्कस स्टॉइनिस, मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांना यश मिळाले नाही. तर पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांना १-१यश मिळाले.

पुढील बातम्या