मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Asia Cup 2022: भारत अजूनही फायनलमध्ये पोहोचू शकतो का? पाहा काय आहे स्थिती

Asia Cup 2022: भारत अजूनही फायनलमध्ये पोहोचू शकतो का? पाहा काय आहे स्थिती

Sep 07, 2022, 02:21 PM IST

    • Asia Cup 2022: श्रीलंकेविरुद्ध पराभवानंतर भारतीय संघाची फायलनसाठी पात्र ठरण्याची शक्यता धूसर झाली आहे. यासाठी आता केवळ जर-तरच्या समीकरणावर अवलंबून रहावं लागेल.
टीम इंडियाच्या फायनलमध्ये पोहचण्याच्या आशा अजुनही जिवंत

Asia Cup 2022: श्रीलंकेविरुद्ध पराभवानंतर भारतीय संघाची फायलनसाठी पात्र ठरण्याची शक्यता धूसर झाली आहे. यासाठी आता केवळ जर-तरच्या समीकरणावर अवलंबून रहावं लागेल.

    • Asia Cup 2022: श्रीलंकेविरुद्ध पराभवानंतर भारतीय संघाची फायलनसाठी पात्र ठरण्याची शक्यता धूसर झाली आहे. यासाठी आता केवळ जर-तरच्या समीकरणावर अवलंबून रहावं लागेल.

Asia Cup 2022: भारताला मंगळवारी आशिया कप २०२२ मध्ये सुपर ४ च्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध पराभूत व्हावं लागलं. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारताने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १७३ धावा केल्या होत्या. भारताने दिलेलं आव्हान श्रीलंकेनं ४ गड्यांच्या मोबदल्यात १ चेंडू राखून पूर्ण केलं. सुपर ४ मध्ये भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे. भारताचा याआधी पाकिस्तानविरुद्ध पराभव झाला होता. दुसऱ्या बाजूला श्रीलंकेचा सुपर ४ मधला हा सलग दुसरा विजय ठरला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

भारताने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या ७२ धावांच्या खेळीच्या जोरावर ८ बाद १७३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या पथुम निसंका आणि कुशल मेंडिस यांनी अर्धशतके झळकावली. याच्या जोरावरच श्रीलंकेने भारताविरुद्धचा सामना जिंकला.

श्रीलंकेविरुद्ध पराभवानंतर भारतीय संघाची फायनलसाठी पात्र ठरण्याची शक्यता धूसर झाली आहे. यासाठी आता केवळ जर-तरच्या समीकरणावर अवलंबून रहावं लागेल. भारत केवळ धावगतीच्या जोरावर फायलनमध्ये जाऊ शकतो, पण त्यासाठी इतर सामन्यांचा निकाल भारताला अनुकूल असा लागायला हवा.

श्रीलंका - श्रीलंकेने पहिले दोन्ही सामने जिंकल्याने त्यांची फायनलमध्ये जाण्याची वाट सोपी झालीय. आता त्यांचा अखेरचा सामना पाकिस्तानविरुद्ध असणार आहे. भारताला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी श्रीलंकेनं पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत करावं लागेल.

पाकिस्तान - पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत आज सामना होणार आहे. भारतासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानला पराभूत केलं तर भारताचं आव्हान इथंच संपुष्टात येईल. यातही अफगाणिस्तानने पाकिस्तावर मोठा विजय मिळवायला हवा.

अफगाणिस्तान - भारताचा सुपर फोरमधील अखेरचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध असणार आहे. या सामन्याआधी अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकायला हवा. तरच भारत स्पर्धेत राहील, त्यानंतर भारताने मोठ्या फरकाने अफगाणिस्तानवर विजय मिळवला तर फायनल गाठता येईल.

विभाग

पुढील बातम्या