मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma: भारतीय संघाचं कुठं चुकलं? कारण सांगताना रोहित शर्मा भडकला

Rohit Sharma: भारतीय संघाचं कुठं चुकलं? कारण सांगताना रोहित शर्मा भडकला

Sep 07, 2022, 08:32 AM IST

    • Rohit Sharma: पाकिस्तानविरुद्धचा सामना गमावल्यानंतर श्रीलंकेविरुद्धही भारताचा पराभव झाला. यामुळे आता आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.
रोहित शर्मा फलंदाजांवर भडकला, गोलंदाजांचे केले कौतुक (फोटो - एपी)

Rohit Sharma: पाकिस्तानविरुद्धचा सामना गमावल्यानंतर श्रीलंकेविरुद्धही भारताचा पराभव झाला. यामुळे आता आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.

    • Rohit Sharma: पाकिस्तानविरुद्धचा सामना गमावल्यानंतर श्रीलंकेविरुद्धही भारताचा पराभव झाला. यामुळे आता आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.

Rohit Sharma: आशिया कप २०२२ मध्ये सुपर फोरमधील दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. आता भारतीय संघाला जर-तरच्या समीकरणावर रहावं लागेल. मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाला अखेरच्या षटकात ६ विकेटने पराभूत व्हावं लागलं. या पराभवानंतर भारतीय संघाची चूक कुठे झाली हे सांगताना कर्णधार रोहित शर्मा फलंदाजांवर संतापला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

रोहित शर्माने सामन्यानंतर म्हटलं की, "आम्ही आणखी १० ते १५ धावा करायला हव्या होत्या. फलंदाजांनी जबाबदारीने खेळायलं हवं, फटके मारताना सावध रहायला हवं. हा संघ बऱ्याच काळापासून चांगला खेळत होता. अशा प्रकारे पराभवातून एक संघ म्हणून शिकायला मिळेल." फलंदाजांवर संताप व्यक्त केला असला तरी गोलंदाजांचे मात्र रोहित शर्माने कौतुक केले आहे. तो म्हणाला की, "श्रीलंकेनं ज्या पद्धतीने सुरुवात केली होती त्यानंतर आपल्या गोलदांजांनी चांगली कामगिरी केली. फिरकीपटूंनी आक्रमक गोलंदाजी केली पण श्रीलंकेने दबावातही चांगला खेळ केला."

मोठं मैदान असल्यानं आम्हाला वाटलं की फिरकीपटूंना चांगला वापर होऊ शकेल. पण आमची ही योजना यशस्वी ठरली नाही. गेल्या वर्ल्ड कपपासून आम्ही जास्त सामने गमावले नाहीत. अजुनही आम्ही काही प्रश्नांची उत्तरे शोधत आहोत असंही रोहित शर्मा म्हणाला.

रोहित शर्माने भारतीय संघ टी२० वर्ल्ड कपसाठी किती तयार आहे हेसुद्धा सांगितले. त्याने म्हटलं की, "आम्ही टी२० वर्ल्ड कप संघाची घोषणा होईपर्यंत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका मालिकेत आणखी खेळाडूंना संधी देऊ. सध्याचा संघ ऑस्ट्रेलियात टी २० वर्ल्ड कप खेळण्यासाठी ९० ते ९५ टक्के तयार आहे. काही बदल नंतर होतील."

विभाग

पुढील बातम्या