मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs SL T20 Live: भारताचा श्रीलंकेकडून पराभव, टीम इंडिया आशिया चषकातून जवळपास बाहेर
IND vs SL

IND vs SL T20 Live: भारताचा श्रीलंकेकडून पराभव, टीम इंडिया आशिया चषकातून जवळपास बाहेर

Sep 06, 2022, 11:19 PMIST

IND vs SL Asia Cup T20 Live Streaming: आशिया चषकाच्या सुपर-४ फेरीत आज भारताचा सामना श्रीलंकेशी झाला. सुपर ४ मधील या सामन्यात श्रीलंकेने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. त्यामुळे भारत आता आशिया चषकातून जवळपास बाहेर पडला आहे. भारतीय संघ सुपर फोर फेरीत सलग दोन सामने हरला आहे. श्रीलंकेपूर्वी पाकिस्तानने भारताचा पाच विकेट्सने पराभव केला होता. भारताचे भवितव्य आता इतर संघांच्या निकालावर अवलंबून असणार आहे.

Sep 06, 2022, 11:33 PMIST

IND vs SL Live: भारताचा ६ विकेट्सनी पराभव

आशिया चषकातील सुपर ४ मधील सामन्यात श्रीलंकेने भारताचा सहा गडी राखून पराभव केला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ८ विकेट गमावून १७३ धावा केल्या होत्या. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात श्रीलंकेने १९.५ षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. या पराभवामुळे भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

तत्पूर्वी, श्रीलंकेने १७४ धावांचे लक्ष्य शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर पूर्ण केले. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने ५७ आणि पाथुम निसांकाने ५२ धावा केल्या. दासुन शनाका ३३ आणि भानुका राजपक्षे २५ धावांवर नाबाद राहिले. श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली आणि त्यांची पहिली विकेट ९७ धावांवर पडली. पण त्यानंतर लंकेने ठराविक अंतराने विकेट गमावल्याने त्यांची धावसंख्या चार बाद ११० अशी झाली. यानंतर शनाका आणि राजपक्षे यांच्या शानदार फलंदाजीने भारताकडून सामना हिरावून घेतला.

श्रीलंका जवळपास फायनलमध्ये

भारतीय संघ सुपर फोर फेरीत सलग दोन सामने हरला आहे. श्रीलंकेपूर्वी पाकिस्तानने भारताचा पाच विकेट्सने पराभव केला होता. भारताचे भवितव्य आता इतर संघांच्या निकालावर अवलंबून असणार आहे. तर श्रीलंकेच्या संघाने जवळपास फायनलमध्ये प्रवेश केला आहे. श्रीलंकेने सलग दोन सामने जिंकले आहेत. भारतापूर्वी श्रीलंकेने अफगाणिस्तानला सुपर-4 मध्ये पराभूत केले होते. सुपर फोरच्या गुणतालिकेत श्रीलंका आता दोन विजयांसह अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर पाकिस्तान एका विजयासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोघांचा नेट रन रेट पॉझिटिव्ह आहे. त्याचवेळी भारत निगेटीव्ह नेट रन रेटसह आणि दोन पराभवांसह तिसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तान चौथ्या स्थानावर आहे.

भारतीय संघाला अजूनही फायनल गाठण्याची संधी आहे. मात्र, बुधवारी होणारा पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यातील सामना भारतासाठी महत्त्वाचा असेल. उद्या पाकिस्तानचा संघ जिंकला, तर भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आशिया कपमधून बाहेर होतील.

Sep 06, 2022, 10:46 PMIST

IND vs SL Live: भारताल सर्वात मोठे यश, कुसल मेंडीस बाद,

१४व्या षटकात ११० धावांवर श्रीलंकेला चौथा धक्का बसला. रविचंद्रन अश्विनने दनुष्का गुणतिलकाला केएल राहुलकडे झेलबाद केले. गुणतिलाका एक धाव काढून बाद झाला.त्यानंतर १५ व्या षटकात चहलने श्रीलंकेला सर्वात मोठा धक्का दिला. त्याने कुसल मेंडीसला पायचीत केले. श्रीलंकेची अवस्था ४ बाद ११२ धावा झाली आहे. आता दोन्ही नवे फलंदाज क्रीझवर आहेत. श्रीलंकेला अजून ३४ चेंडूत ६२ धावा करायच्या आहेत. दासून शानका आणि भानुका राजपाक्से खेळत आहेत. कुसल मेंडीसने ३७ चेंडूत ५७ धावा केल्या.

Sep 06, 2022, 10:37 PMIST

KUSAL MENDIS: कुसल मेंडीसचे अर्धशतक

कुसल मेंडीसने ३४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तो सध्या ३५ चेंडूत ५७ धावा करुन खेळत आहे. त्याने आपल्या खेळीत आतापर्यंत ४ चौकार आणि ३ षटकार खेचले आहेत. 

Sep 06, 2022, 10:32 PMIST

IND vs SL Live: १२ वं षटक भारताचं, चहलनं श्रीलंकेला दिले दोन धक्के

युझवेंद्र चहलने श्रीलंकेला पहिला धक्का दिला. त्याने १२ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पथुम निसांकाला बाद केले. निसांकाने कुसल मेंडिससोबत पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. निसांका ३७ चेंडूत ५२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार आणि दोन षटकार मारले. रोहितने निसांकाचा झेल घेतला. त्यानंतर चहलने याच षटकात चरित अस्लंकालाही बाद केले. तीन चेंडू खेळून अस्लंका शुन्यावर बाद झाला. सूर्यकुमार यादवने त्याचा झेल घेतला.

Sep 06, 2022, 10:18 PMIST

IND vs SL Live: निसांकाचे अर्धशतक, श्रीलंकेच्या १० षटकात ८९ धावा

१० षटकांनंतर श्रीलंकेने एकही विकेट न गमावता ८९ धावा केल्या. पथुम निसांकाने ३३ चेंडूत शानदार अर्धशतक झळकावले आहे. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि २ षटकार खेचले आहेत. तसेच, दुसरा सलामीवीर कुसल मेंडिस २६ चेंडूत ३९ धावांवर खेळत आहे. भारतीय गोलंदाज विकेटसाठी तरसत आहेत. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या आणि अश्विन हे तिघेही विकेट घेण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत.

Sep 06, 2022, 10:03 PMIST

IND vs SL Live: श्रीलंकेची धमाकेदार सुरुवात, पॉवरप्लेमध्ये बिनबाद ५७ धावा

६ षटकांनंतर श्रीलंकेच्या धावा झाल्या आहेत. १७४ धावांचा पाठलगा करताना त्यांच्या दोन्ही सलामीवीरांनी धमाकेदार सुरुवात केली आहे. पाथुम निसांका २१ चेंडूत ३३ धावा तर कुसल मेंडीस १५ चेंडूत २४ धावांवर खेळत आहेत. 

Sep 06, 2022, 09:31 PMIST

IND vs SL Live: भारताचे श्रीलंकेसमोर १७४ धावांचे लक्ष्य

भारताने श्रीलंकेसमोर १७४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला २० षटकांत ८ गडी गमावून १७३ धावा करता आल्या. कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४१ चेंडूत ७२ धावा केल्या. हे त्याचे टी-20 कारकिर्दीतील २८ वे अर्धशतक होते. त्याचवेळी श्रीलंकेकडून डावखुरा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंका, करुणारत्ने आणि कर्णधार दासून शनाका यांनी घातक गोलंदाजी केली. मधुशंकाने ३ आणि करुणारत्ने-शनाकाने प्रत्येकी २ गडी बाद केले.

Sep 06, 2022, 09:20 PMIST

IND vs SL Live: हुडा-पंत एकाच षटकात बाद

हुडा आणि पंत १९ व्या षटकात बाद झाले. दोघांना मधुशंकाने बाद केले. हुडा ३ धावांवर क्लीन बोल्ड झाला. तर पंत १७ धावांवर झेलबाद झाला. पंतने १३ चेंडूंचा सामना करताना ३ चौकार मारले. १९ षटकानंतर भारताची धावसंख्या ७ बाद १६१ झाली आहे.

Sep 06, 2022, 09:15 PMIST

IND vs SL Live: हार्दिक पंड्या पॅव्हेलियनमध्ये, १८ षटकांनंतर भारताची धावसंख्या ५ बाद १५७

भारताला १८व्या षटकात १४९ धावांवर पाचवा धक्का बसला. हार्दिक पांड्या १३ चेंडूत १७ धावा काढून बाद झाला. त्याला श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने निसांकाच्या हाती झेलबाद केले. १८ षटकांनंतर भारताची धावसंख्या ५ बाद १५७ आहे. ऋषभ पंत आणि दीपक हुडा सध्या क्रीजवर आहेत.

Sep 06, 2022, 08:58 PMIST

IND vs SL Live: १५ षटकानंतर भारताच्या ४ बाद १२७ धावा

१५ षटकानंतर भारताच्या ४ बाद १२७ धावा झाल्या आहेत. रोहित-सुर्या तंबूत परतले आहेत, सध्या हार्दिक पांड्या आणि पंत खेळत आहेत. सुर्यकुमार यादव २९ चेंडूत ३३ धावा करुन बाद झाला. त्याला दासुन शानकाने झेलबाद केले.

Sep 06, 2022, 08:57 PMIST

Rohit Sharma: कर्णधार रोहित शर्मा ४० चेंडूत ७२ धावा करुन बाद

कर्णधार रोहित शर्मा ४० चेंडूत ७२ धावा करुन बाद झाला. त्याला करुनारत्नेने झेलबाद केले. रोहितने ४१ चेंडूत ७२ धावा ठोकल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ४ षटकार मारले. रोहित आणि सुर्या यांच्यात ९७ धावांची भागीदारी झाली.

Sep 06, 2022, 08:40 PMIST

Rohit Sharma : १२ षटकांनंतर भारताच्या २ बाद १०९ धावा

१२ षटकांनंतर भारताच्या २ बाद १०९ धावा झाल्या आहेत. या दरम्यान कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक झळकावले आहे. रोहित ४० चेंडूत ७२ धावा करुन खेळत आहे. तर सुर्यकुमार यादव २१ चेंडूत २८ धावा करुन खेळत आहे. दोघांमध्ये ९६ धावांची भागिदारी झाली आहे.

Sep 06, 2022, 08:19 PMIST

IND vs SL Live: रोहित-सूर्याने डाव सावरला

८ षटकांनंतर भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात ५४ धावा केल्या. सध्या रोहित शर्मा ३९चेंडूत २७ धावा आणि सूर्यकुमार यादव ११ चेंडूत ८ धावा करून क्रीजवर आहेत. भारतीय संघाला पहिल्या दोन षटकांत दोन धक्के बसले. राहुल सहा धावा आणि कोहली खाते न उघडता बाद झाला. महेश थीक्षाना आणि मधुशंका यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Sep 06, 2022, 08:15 PMIST

IND vs SL Live: ६ षटकानंतर भारताच्या २ बाद ४४ धावा

६ षटकानंतर भारताच्या २ बाद ४४ धावा झाल्या आहेत. पॉवर प्लेमध्ये भारताने दोन मोठे विकेट्स गमावले आहेत. विराट शुन्यावर तर केएल राहुल ६ धावा काढून बाद झाले. सध्या रोहित शर्मा आणि सुर्य कुमारयादव क्रीझवर आहेत. कर्णधार रोहित २१ चेंडूत ३० धावांवर खेळत आहे. 

Sep 06, 2022, 08:15 PMIST

IND vs SL Live: भारताला दुसरा धक्का, विराट कोहली क्लीन बोल्ड

भारताला तिसऱ्याच षटका दुसरा मोठा धक्का बसला. विराट कोहलीला श्रीलंकेचा नवखा गोलंदाज दिलशान मधुशंकाने क्लीन बोल्ड केले आहे. विराट शुन्यावर बाद झाला. ३ षटकानंतर भारताच्या २ बाद १५ धावा झाल्या आहेत.

Sep 06, 2022, 08:15 PMIST

IND vs SL Live: दुसऱ्याच षटकात भारताला धक्का, केएल राहुल बाद

भारताला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर केएल राहुल बाद झाला आहे. राहुलने ७ चेंडूत ६ धावा केल्या. त्याने एक चौकार मारला. राहुलला फिरकीपटू महीश थीक्षणाने पायचित केले. सध्या विराट कोहली आणि रोहित शर्मा क्रीझवर आहेत.

Sep 06, 2022, 07:35 PMIST

IND vs SL Live: रोहित-राहुल मैदानात 

श्रीलंकेने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल सलामीला आले आहेत.

Sep 06, 2022, 07:06 PMIST

IND vs SL Live: दोन्ही संघ खालीलप्रमाणे 

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, हार्दिक पांड्या, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.

श्रीलंका: पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), चारिथ अस्लंका, दानुष्का गुनाथिलका, भानुका राजपक्षे, दासून शानाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश तिक्षा, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका.

Sep 06, 2022, 07:05 PMIST

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला

आशिया चषकाच्या सुपर-४ फेरीत श्रीलंकेने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. रवी बिष्णोईच्या जागी अनुभवी आर. अश्विनला संधी देण्यात आली आहे.

Sep 06, 2022, 06:42 PMIST

IND vs SL Live: सलग दोन विजयांमुळे श्रीलंकेचा उत्साह वाढला

सलामीच्या लढतीत दारूण पराभवानंतर श्रीलंकेने बांगलादेश आणि अफगाणिस्तानला अतितटीच्या सामन्यात पराभूत करून आपली मोहीम पुन्हा रुळावर आणली. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज चरित अस्लंका वगळता श्रीलंकेच्या फलंदाजांनी या स्पर्धेत चांगलाच प्रभाव पाडला आहे. बांगलादेशविरुद्ध कर्णधार दासून शनाका आणि कुसल मेंडिस तर अफगाणिस्तानविरुद्ध धनुष्का गुणातिलके आणि भानुका राजपक्षे यांनी प्रभावी खेळी खेळली होती.

Sep 06, 2022, 06:01 PMIST

अक्षर पटेल अश्विन यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या हिरो ठरला होता. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तो बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी करु शकला नाही. तसेच, युझवेंद्र चहलदेखील आऊट ऑफ फॉर्म दिसत आहे. विशेष म्हणजे रविंद्र जडेजा स्पर्धेबाहेर पडल्याने संघ अडचणीत सापडला आहे. जडेजाच्या जागी संघाला समतोल राखण्यासाठी अक्षर पटेलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो.

Sep 06, 2022, 06:01 PMIST

ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यापैकी कोण खेळेल?

ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यापैकी कोण खेळेल, याबाबत संभ्रम आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिकच्या जागी दीपक हुड्डाला खेळवण्यात आले होते. कार्तिकला त्याला बाहेर ठेवल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Sep 06, 2022, 06:00 PMIST

दोन्ही देशांचे संभाव्य संघ

श्रीलंका: पथुम निशांका, कुशल मेंडिस (विकेटकीपर), चरित अस्लंका, धनुष्का गुणतिलाका, भानुका राजपक्षे, दासून शनाका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थीक्षना/प्रवीण जयविक्रमा, असिथा फर्नांडो, दिलशान मधुशंका.

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल,, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग.

    शेअर करा