मराठी बातम्या  /  धर्म  /  Dharma News : का माता सीतेला गर्भवती असताना सोसावा लागला होता श्रीरामांचा विरह?

Dharma News : का माता सीतेला गर्भवती असताना सोसावा लागला होता श्रीरामांचा विरह?

May 11, 2023, 07:07 AM IST

  • Interesting Facts Of Ramayana : रामायणात गर्भवती असताना सीता मातेला श्रीरामांचा विरह सोसावा लागल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र हा विरह नेमका का सोसावा लागला, याबाबत एक कहाणी सांगण्यात आली आहे.

रामायणातल्या काही माहीत नसलेल्या गोष्टी (लाइव्ह हिंदुस्तान)

Interesting Facts Of Ramayana : रामायणात गर्भवती असताना सीता मातेला श्रीरामांचा विरह सोसावा लागल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र हा विरह नेमका का सोसावा लागला, याबाबत एक कहाणी सांगण्यात आली आहे.

  • Interesting Facts Of Ramayana : रामायणात गर्भवती असताना सीता मातेला श्रीरामांचा विरह सोसावा लागल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र हा विरह नेमका का सोसावा लागला, याबाबत एक कहाणी सांगण्यात आली आहे.

एकदा माता सीता आपल्या काही मैत्रिणींसोबत राजमहालाच्या उदयानात खेळत होती. तिथल्याच एका झाडावर पोपटांची जोडी बसली होची आणि ते आपापसात काहीतरी बोलत होते. अयोध्येचे प्रभू श्रीराम यांच्या सेबत सीतेचा विवाह होईल, असं काहीतरी ते बोल होते. खेळता खेळता सीतेची नजर त्या पोपटांवर पडली आणि त्यांचे बोलणं माता सीता बारकाईने ऐकू लागली.

ट्रेंडिंग न्यूज

Masik Pradosh Vrat : मे महिन्यात मासिक प्रदोष व्रत कधी? अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय? जाणून घ्या

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

अयोध्येचे श्रीराम अत्यंत देखणे आहेत, त्यांच्यासोबत सीतेचा विवाह होईल असं त्या पोपटांचं बोलणं कानी पडताच आणि त्यात आपलं नाव असल्याचं ऐकताच, माता सीतेने त्या पोपटांना पकडा असं फर्मान सोडलं आणि त्या पोपटांना बंदी बनवण्यात आलं.

पोपटांची ती जोडी अत्यंत घाबरलेली होती. मात्र सीतेन आपण तुम्हाला कोणतीही इजा करणार नाही असं सांगितल्यानंतर त्यांची भीती चेपली गेली आणि त्यांनी बोलण्यास सुरूवात केली.

अयोध्येचे देखणे राजकुमार श्रीराम यांचा सीतेशी विवाह होणार आहे, या गोष्टीचा त्यांनी पुनरूच्चार करताच सीतेने त्यांना आपणच सीता असल्याचं सांगितलं. तुम्हाला या सर्व गोष्टी कशा माहिती आहेत असं सीतेने विचारताच ते पोपट म्हणाले की आम्ही वाल्मिकी नावाचे एक ऋषी आहेत. ते फक्त त्याच्या आश्रमात राहतात. वाल्मिकी श्री राम आणि सीता यांच्या जीवनावर दररोज चर्चा करतात. आम्ही हे सर्व तिथेच ऐकले जे आता सर्व लक्षात आहे.

हे ऐकताच सीतेने आणखी काय माहिती आहे ते सांगा असं त्या पोपटांच्या जोडीला सांगितलं.दशरथपुत्र श्रीराम शिवधनुष्य भंग करतील आणि सीता त्यांना आपल्या पतीच्या रुपात निवडेल असं त्या पोपटांच्या जोडीने सांगितलं. एव्हाना ही जोडी बडबड करत दमली होती. सीतेने त्यांना आपल्या महालात राहाण्यास सांगितलं.

हे ऐकताच ही जोडी म्हणाली की आम्ही वनात राहातो आणि त्यातली मादा म्हणाला की मी गर्भवती आहे आणि मला माझ्या घरट्यात अंडी घालायची आहेत. मात्र सीता हट्टाला पेटली आणि तिनं काही केल्या त्या जोडीची सुटका केली नाही. एकवेळ तिनं नर पोपटाला सांगितलं की तुला जायचं असेल तर जा मात्र मी हिला काही केल्या सोडणार नाही

आर्जवं करत त्यातल्या मादा पोपटाने जीव सोडला. मात्र जीव सोडताना तिनं सीतेला श्राप दिला की, एका गर्भवतीला ज्याप्रकारे तू आपल्या पतीपासून वेगळं करत आहेत, त्याचप्रमाणे तू ग्रभवती असताना तुला आपल्या पतीचा विरह सोसावा लागेल.

आपल्या पत्नीने जीव सोडल्याचं पाहून त्या नर पोपटानेही जीव सोडला मात्र त्याआधी त्यानंही सीतेला श्राप दिला की, माझ्या बायकोचं वचन सत्य करायला मी अयोध्येत जन्म घेईन.

हाच पोपट पुढे अयोध्येतला तो धोबी बनला, ज्याच्या खोट्या बोलण्यासमोर राम विवश झाला आणि त्यानं गर्भवती सीतेला महालातून हाकलून लावलं.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या