मराठी बातम्या  /  धर्म  /  Vinayak Chaturthi 2023: वर्षातली शेवटची विनायक चतुर्थी कधी? जाणून घ्या शुभ योग आणि महत्व

Vinayak Chaturthi 2023: वर्षातली शेवटची विनायक चतुर्थी कधी? जाणून घ्या शुभ योग आणि महत्व

Dec 15, 2023, 12:01 PM IST

  • Vinayak Chaturthi 2023 Date And Shubh Yog: सर्वप्रथम पुजनीय गणपती बाप्पाची पूजा आणि उपवास केल्याने सुख सौभाग्याची प्राप्ती होते. वर्ष २०२३ मधली शेवटची विनायक चतुर्थी कधी आहे, जाणून घेऊया शुभ मुहूर्त, शुभ योग तसेच पूजा विधी आणि महत्व.

Vinayak Chaturthi December 2023

Vinayak Chaturthi 2023 Date And Shubh Yog: सर्वप्रथम पुजनीय गणपती बाप्पाची पूजा आणि उपवास केल्याने सुख सौभाग्याची प्राप्ती होते. वर्ष २०२३ मधली शेवटची विनायक चतुर्थी कधी आहे, जाणून घेऊया शुभ मुहूर्त, शुभ योग तसेच पूजा विधी आणि महत्व.

  • Vinayak Chaturthi 2023 Date And Shubh Yog: सर्वप्रथम पुजनीय गणपती बाप्पाची पूजा आणि उपवास केल्याने सुख सौभाग्याची प्राप्ती होते. वर्ष २०२३ मधली शेवटची विनायक चतुर्थी कधी आहे, जाणून घेऊया शुभ मुहूर्त, शुभ योग तसेच पूजा विधी आणि महत्व.

Vinayak Chaturthi 2023 : चतुर्थी म्हटले म्हणजे आपल्याला गणपती बाप्पाच्या नामस्मरणाची आठवण होते. गणपती बाप्पाचे सुखकर्ता, दुख:हर्ता, विघ्नहर्ता, विनायक, गणेशा अशा कितीतरी नावांनी स्मरण केले जाते. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थी तिथीचे खास महत्व आहे. शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते.

ट्रेंडिंग न्यूज

Masik Pradosh Vrat : मे महिन्यात मासिक प्रदोष व्रत कधी? अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय? जाणून घ्या

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

वर्ष २०२३ चा हा शेवटचा महिना असून, या वर्षातली शेवटची विनायक चतुर्थी सर्वार्थ सिद्धी या खास योगात असणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी शुक्रवार १५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल तर शनिवार १६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता समाप्त होईल. सुर्योदयाची तिथी मानली जाते त्यानुसार १६ डिसेंबर रोजी विनायक चतुर्थीचे व्रत साजरे करण्यात येईल.

विनायक चतुर्थीला शुभ योग

मार्गशीर्ष महिन्यातील विनायक चतुर्थीला घडणारा सर्वार्थ सिद्धी योगामुळे या दिवसाला खास महत्व प्राप्त होत असून, १६ तारखेला सकाळी ७ वाजून ७ मिनिटे ते १७ तारखेला ४ वाजून ३७ मिनिटापर्यंत हा योग राहील. या योगात केलेल्या गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने सुख सौभाग्याची प्राप्ती होते तसेच सर्व विघ्न दूर होतात अशी मान्यता आहे. या दिवशी केलेल्या व्रतामुळे बौद्धिक गुणांचीही प्राप्ती होते. तसेच प्रगतीच्या संधीही प्राप्त होतात अशी मान्यता आहे.

विनायक चतुर्थी पूजा विधी

विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करावे आणि गणेशाच्या पूजेची तयारी करावी. लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र घालावी. गणपती बाप्पाचा अभीषेक करावा, गणपतीला शेंदूर फार प्रिय आहे त्यामुळे या दिवशी शेंदूरचा टीळा गणपतीला लावावा. क्षमा प्रार्थना करून, गणपतीला दुर्वा, फळे, फुले अर्पण करावी, नैवेद्य अर्पण करावा. गणपतीची मनोभावे आरती करावी.

विनायक चतुर्थीला या मंत्राचा करा जप

गणपती बाप्पाचे नामस्मरण आणि पूजा केल्याने जीवनातील दुख: कमी होते. विनायक चतुर्थीच्या दिवशी 'ॐ विनायकाय नमः', 'ॐ सुमुखाय नमः', 'ॐ महागणपतये नमः', 'ॐ हेरम्बाय नमः', 'ॐ विघ्नहर्त्रे नमः', 'ॐ श्रीपतये नमः' या मंत्राचा तसेच, गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या