मराठी बातम्या  /  धर्म  /  Vidhi Upay : लग्नात अग्नीला साक्षी मानत का घातली जाते सप्तपदी? काय आहे मंगळसुत्राचं महत्व?

Vidhi Upay : लग्नात अग्नीला साक्षी मानत का घातली जाते सप्तपदी? काय आहे मंगळसुत्राचं महत्व?

May 02, 2023, 10:27 AM IST

  • Why Mangal Sutra Is Important While Marriage : लग्न किंवा विवाह हे एक पवित्र बंधन आहे ज्यात अतिशय आनंदाने एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होत एकमेकांच्या साथीने जीवन परिपूर्ण बनवण्याची शपथ घेतली जाते.

लग्नात का घेतली जाते सप्तपदी (HT)

Why Mangal Sutra Is Important While Marriage : लग्न किंवा विवाह हे एक पवित्र बंधन आहे ज्यात अतिशय आनंदाने एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होत एकमेकांच्या साथीने जीवन परिपूर्ण बनवण्याची शपथ घेतली जाते.

  • Why Mangal Sutra Is Important While Marriage : लग्न किंवा विवाह हे एक पवित्र बंधन आहे ज्यात अतिशय आनंदाने एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होत एकमेकांच्या साथीने जीवन परिपूर्ण बनवण्याची शपथ घेतली जाते.

लग्न किंवा विवाह हे एक पवित्र बंधन आहे ज्यात अतिशय आनंदाने एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होत एकमेकांच्या साथीने जीवन परिपूर्ण बनवण्याची शपथ घेतली जाते. लग्न हे फक्त दोन जीवांचं नाही तर दोन परिवारांचं किंवा दोन कुटुंबांचं मिलन आहे असं म्हटलं जातं. लग्नात सर्वात महत्वाचा विधी म्हणजे सप्तपदी. सप्तपदीमध्ये अग्नीला साक्षी ठेवलं जातं. अग्नी या तत्वाला सर्वात जास्त महत्व हिंदू धर्मशास्त्रात देण्यात आलं आहे. म्हणूनच सूर्यालाही हिंदू धर्मशास्त्रात अत्यंत महत्व प्राप्त झालं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vat Savitri Purnima 2024 : वट सावित्री व्रत कधी आहे? नेमकी तारीख आणि पूजेची शुभ वेळ जाणून घ्या

या ४ राशींचे लोक पैसे वाचवण्यात आघाडीवर असतात, कोणत्या आहेत त्या राशी? जाणून घ्या

Narasimha Jayanti : कोण आहे भगवान नृसिंह? वाचा विष्णू देवाच्या चौथ्या अवताराची कथा आणि पूजेची शुभ वेळ

Weekly Festivals : बुद्ध पौर्णिमा ते एकदंत चतुर्थी… मे महिन्याच्या ‘या’ आठवड्यातील सणांची यादी, पाहा

हिंदू धर्म ग्रंथांमध्ये अग्नीला सूर्यदेवाचे प्रतिनिधी मानले गेले आहे. सूर्य हा जगाचा आत्मा आणि विष्णूचे रूप आहे. अग्नीसमोर प्रदक्षिणा घालणे म्हणजे परमपित्यासमोर प्रदक्षिणा घालणे असा त्याचा अर्थ होतो. अग्नी हे असं माध्यम आहे ज्याद्वारे देवतांना यज्ञ करून प्रसन्न केल जातं. अशाप्रकारे सर्व देवतांना अग्नीच्या रूपात साक्षी मानून त्यांना पवित्र बंधनात बांधण्याचा नियम धर्मग्रंथात करण्यात आला आहे. यामुळेच अग्नीसमोर सप्तपदी घातल्याशिवाय विवाह पूर्ण मानला जात नाही.

सप्तपदी सोबत लग्नात आणखी एक महत्वाचा रिवाज पाहायला मिळतो तो म्हणजे वर लग्नात वधूला मंगळसुत्र घालतो. मंगळसुत्राशिवाय लग्नाची पूर्ती होत नाही असं मानलं जाते. मग हे मंगळसुत्र का घातलं जातं यामागेही कारण आहे. काय आहे ते कारण पाहूया.

मंगळसूत्रात काळ्या रंगाचे मणी असतात. यासोबतच दोन वाटया असतात किंवा एखादं लॉकेट असतं. पौराणिक मान्यतेनुसार, मगळसुत्र स्त्रीच्या नवऱ्याचं वाईट गोष्टींपासून रक्षण करतं.काळे मणी वाईट नजरेपासून रक्षण करतात. यासाठीच मंगळसुत्र घालणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या