मराठी बातम्या  /  धर्म  /  Garuda Purana : या चार गोष्टींनी करा दिवसाची सुरूवात, पाहा काय सांगतं गरूड पुराण?

Garuda Purana : या चार गोष्टींनी करा दिवसाची सुरूवात, पाहा काय सांगतं गरूड पुराण?

May 30, 2023, 08:26 AM IST

  • Importance Of Garuda Purana : आज आपण दिवसाची सुरूवात कोणत्या चार कार्यांनी करावी याबाबत गरूड पुराण काय सांगतं हे पाहाणार आहोत.

गरूड पुराण (Unsplash)

Importance Of Garuda Purana : आज आपण दिवसाची सुरूवात कोणत्या चार कार्यांनी करावी याबाबत गरूड पुराण काय सांगतं हे पाहाणार आहोत.

  • Importance Of Garuda Purana : आज आपण दिवसाची सुरूवात कोणत्या चार कार्यांनी करावी याबाबत गरूड पुराण काय सांगतं हे पाहाणार आहोत.

गरुड पुराण हे भगवान विष्णूंनी त्यांच्या वाहन गरुडाच्या उत्सुकतेला शांत करण्यासाठी सांगितलेल्या गोष्टींचे संकलन आहे. या पुराणाचे प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत. यामध्ये भक्ती, ज्ञान, शांतता, सदाचार, नि:स्वार्थी कार्याच्या महिमाबरोबरच यज्ञ, दान, तपश्चर्या, तीर्थयात्रा इत्यादी शुभ कर्मांमध्ये सर्वसामान्यांना प्रवृत्त करण्यासाठी अनेक लौकिक व इतर ऐहिक फलांचे वर्णन केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एका दिवसात किती भाविक चारधामचे दर्शन घेऊ शकतील? सध्या सर्व धामांचे हवामान कसे आहे? जाणून घ्या

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या रात्री घरात या ठिकाणी दिवे लावा, धनाची आवक वाढेल

Char Dham Yatra: अक्षय्य तृतीयेला सुरू होतेय चार धाम यात्रा! कसे आणि कुठे करावे ऑनलाईन रजिस्ट्रेशन?

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला तुमच्या राशीनुसार खरेदी करा या वस्तू, देवी लक्ष्मी छप्परफाड पैसा देईल

आज आपण दिवसाची सुरूवात कोणत्या चार कार्यांनी करावी याबाबत गरूड पुराण काय सांगतं हे पाहाणार आहोत.

सकाळी उठल्यावर परमेश्वर दर्शन करावे

गरुड पुराणात सांगितले आहे की दिवसाची सुरुवात परमेश्वराचे दर्शन आणि विधिवत पूजा करून करावी. जी व्यक्ती आपल्या दिवसाची सुरुवात देव आणि पूर्वजांच्या आशीर्वादाने करते, त्याला जीवनात नेहमी यश मिळते असं गरूड पुराण सांगतं.

जेवणापूर्वी देवाला नैवेद्य दाखवावा

घरातलं स्वयंपाकघर हे माता अन्नपूर्णेचं स्थान मानलं गेलं आहे. घरातली स्त्री ही अन्नपूर्णेचं रूप मानली गेली आहे. घरात जे अन्न बनतं त्याचा नैवेद्य आधी परमेश्वराला दाखवावा आणि मग तोच नैवेद्य ग्रहण करावा असं केल्याने माता अन्नपूर्णा तुमच्या घरावर प्रसन्न राहाते. मात्र देवाला अर्पण करण्यात येणारा नैवेद्य सात्विक असावा हे लक्षात ठेवावे.

गरजूंची सेवा करावी

विष्णू पुराणात भगवाना सांगतात की माझा खरा भक्त तोच जो गरीब किंवा गरजूंची सेवा करणारा असेल. सकाळी घरातून बाहेर पडल्यावर एखाद्या गरजूला दान करावं. एखाद्याला काही मदतीची गरज भासली तर त्याला मदत करावी असंही गरूड पुराणात सांगण्यात आलं आहे. अशा व्यक्तीला आयुष्यात कधीही धनाची कमतरता राहात नाही असं गरूड पुराण सांगतं.

आत्मचिंतन करावं

चूक आणि बरोबर काय आहे हे समजण्यासाठी दिवसातून एकदा तरी व्यक्तीने आत्मचिंतन करावं असं गरूड पुराण सांगतं. आत्मचिंतन केल्याने भविष्यात घ्यावे लागणारे निर्णय काळजीपूर्वक घेता येतील असं गरूड पुराणात सांगण्यात आलं आहे.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या