मराठी बातम्या  /  धर्म  /  Shattila Ekadashi : षट्तीला एकादशी कधी आहे? तिथी, मुहूर्त, शुभ योग, पूजा पद्धत आणि महत्व

Shattila Ekadashi : षट्तीला एकादशी कधी आहे? तिथी, मुहूर्त, शुभ योग, पूजा पद्धत आणि महत्व

Jan 31, 2024, 03:03 PM IST

  • Shattila Ekadashi 2024 Date : जाणून घ्या षट्तीला एकादशी कधी आहे? या एकादशीची तिथी, मुहूर्त, शुभ योग, पूजा पद्धत आणि महत्व काय आहे. तसेच, या एकादशीला षट्तीला एकादशी का म्हणतात हे देखील वाचा.

Shattila Ekadashi 2024

Shattila Ekadashi 2024 Date : जाणून घ्या षट्तीला एकादशी कधी आहे? या एकादशीची तिथी, मुहूर्त, शुभ योग, पूजा पद्धत आणि महत्व काय आहे. तसेच, या एकादशीला षट्तीला एकादशी का म्हणतात हे देखील वाचा.

  • Shattila Ekadashi 2024 Date : जाणून घ्या षट्तीला एकादशी कधी आहे? या एकादशीची तिथी, मुहूर्त, शुभ योग, पूजा पद्धत आणि महत्व काय आहे. तसेच, या एकादशीला षट्तीला एकादशी का म्हणतात हे देखील वाचा.

फेब्रुवारीमध्ये पौष कृष्णपक्षाच्या एकादशी तिथीला षट्तीला एकादशी म्हणतात. या दिवशी तिळाचा वापर अत्यावश्यक आहे. चला जाणून घेऊया षट्तीला एकादशीची तिथी, शुभ योग, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व.

ट्रेंडिंग न्यूज

Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय? जाणून घ्या

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

Sita Navami : सीता नवमी कधी आहे? जाणून घ्या तिथीचे महत्व, पूजनाची योग्य पद्धत, मंत्र आणि स्तोत्र

प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात. पारंपारिक धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित आहे. महाराष्ट्रात एकादशीला संत मेळावा व वारकऱ्यांची पालखी निघते. आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपूरला मोठा सोहळा संपन्न होतो व यात्रा भरते. या दिवशी उपवासासह पूजा केल्यास भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. या व्रताच्या प्रभावामुळे पापातून मुक्ती मिळते.

फेब्रुवारी महिन्यातील पौष कृष्ण पक्षाच्या एकादशीला षट्तीला एकादशी केली जाईल. या दिवशी तिळाचा वापर अत्यावश्यक आहे. या व्रतामध्ये तीळ दान केल्याने मोक्ष प्राप्त होतो, अशी मान्यता आहे.

षट्तीला एकादशी तिथी शुभ मुहूर्त: 

पंचांगानुसार, पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी फेब्रुवारी महिन्यात ५ तारखेला संध्याकाळी ५ वाजून २४ मिनिटांनी सुरू होईल. तर ६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ वाजून ७ मिनिटांनी संपेल. उदयातिथीनुसार ६ फेब्रुवारीला षट्तीला एकादशी साजरी होणार आहे.

तिळाच्या सहा प्रकारामुळे ही एकादशी षट्तिला एकादशी म्हणून ओळखली जाते.

१. तीळ स्नान, २. तीळ उटणे, ३. तीळ हवन, ४. तीळ तर्पण, ५. तीळ भोजन, ६. तीळ दान हे तिळाचे सहा प्रकार आहे. आणि हे व्रत केल्याने अनेक पाप नष्ट होतात आणि मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते असे सांगितले जाते.

षट्तीला एकादशी पूजा पद्धत : 

एकादशीचे व्रत विधीनुसार पाळावे. जर तुम्ही षट्तीला एकादशीला उपवास करणार असाल तर एकादशीला ब्रह्म मुहूर्तावर उठून घर स्वच्छ करावे. स्नान करून देवी-देवतांचे ध्यान करावे. यानंतर उपवासाचा संकल्प करावा. नित्य देवपूजेनंतर भगवान विष्णूचीही विधीवत पूजा करा. देवतेला फुले, पाणी, धूप, दिप अर्पण करा. आरती करून क्षमा प्रार्थना करा. प्रसाद वाटा. या दिवशी गरजूंना अन्नदान करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी व्रत सोडावे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या