मराठी बातम्या  /  धर्म  /  Dream Interpretation : स्वप्नात हत्ती दिसणं शुभ असतं की अशुभ, काय सांगतं स्वप्नशास्त्र?

Dream Interpretation : स्वप्नात हत्ती दिसणं शुभ असतं की अशुभ, काय सांगतं स्वप्नशास्त्र?

Dec 15, 2022, 05:16 PM IST

  • Seeing Elephant In Your Dreams Is Good Or Bad : कधी अचानक स्वप्नात गजराज दिसणं आपल्याला बुचकळ्यात पाडू शकतं. मग हत्ती स्वप्नात दिसणं चांगलं आहे की वाईट याचा आपण विचार करु लागतो.

स्वप्नात हत्ती दिसणे शुभ की अशुभ (हिंदुस्तान टाइम्स)

Seeing Elephant In Your Dreams Is Good Or Bad : कधी अचानक स्वप्नात गजराज दिसणं आपल्याला बुचकळ्यात पाडू शकतं. मग हत्ती स्वप्नात दिसणं चांगलं आहे की वाईट याचा आपण विचार करु लागतो.

  • Seeing Elephant In Your Dreams Is Good Or Bad : कधी अचानक स्वप्नात गजराज दिसणं आपल्याला बुचकळ्यात पाडू शकतं. मग हत्ती स्वप्नात दिसणं चांगलं आहे की वाईट याचा आपण विचार करु लागतो.

कधी अचानक स्वप्नात गजराज दिसणं आपल्याला बुचकळ्यात पाडू शकतं. मग हत्ती स्वप्नात दिसणं चांगलं आहे की वाईट याचा आपण विचार करु लागतो.मात्र हत्ती स्वप्नात आल्यावर तो कोणत्या स्थितीत आपल्या समोर आला आहे हे महत्वाचं असतं. हत्ती अचानक तुमच्या समोर येऊन उभा राहाणं हे चांगलं लक्षण मानलं जात नाही. 

ट्रेंडिंग न्यूज

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

Sita Navami : सीता नवमी कधी आहे? जाणून घ्या तिथीचे महत्व, पूजनाची योग्य पद्धत, मंत्र आणि स्तोत्र

Sambhaji Maharaj Jayanti : महान योद्धा आणि अतुलनीय रणनीती कौशल्य… संभाजी राजांनी १२० युद्धं लढली, एकही पराभव नाही

ज्योतिषशास्त्रानुसार हत्ती हे इंद्रदेव, बुधदेव आणि गुरु बृहस्पती यांचे वाहन आहे. त्याचबरोबर हत्तीला गणेशाचे सूचक देखील म्हटले जाते. हत्ती हा समृद्धीचाही सूचक मानला जातो.

स्वप्नात हत्ती दिसण्याचा काय अर्थ असतो?

स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात हत्ती दिसणे शुभ लक्षण मानले जाते. असे मानले जाते की तुमचे नशीब आणि आनंद वाढू शकतो.

स्वप्नात हत्तीवर स्वार होणे शुभ की अशुभ

जर तुम्ही स्वप्नात हत्तीवर स्वार होत असाल तर स्वप्न शास्त्रानुसार ते घरात सुख, शांती, समृद्धी आणि कौटुंबिक वाढीचे प्रतीक मानले जाते.

स्वप्नात हत्ती उभा असल्याचं पाहाणे याचा काय अर्थ घ्यावा?

जर तुम्ही स्वप्नात हत्ती उभा असल्याचे पाहिले असेल तर ते अशुभ मानले जाते. तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात हे त्याचे संकेत देतात.

स्वप्नात हत्ती आणि हत्तीणीची जोडी पाहणे

स्वप्नात हत्ती आणि हत्तीची जोडी दिसणे खूप शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार हे वैवाहिक जीवनात आनंदाचे प्रतीक मानले जाते.

स्वप्नात ऐरावत हत्ती पाहणे

स्वप्नात ऐरावत हत्ती दिसणे शुभ लक्षण मानले जाते. स्वप्नातील पुस्तकानुसार, तुम्हाला राज्याकडून सन्मान मिळू शकतो. तुम्हाला काही चमकदार वस्तू सापडतील.

गर्भवती महिलेच्या स्वप्नात हत्ती पाहणे

गर्भवती महिलेला स्वप्नात हत्ती दिसणे खूप शुभ मानले जाते. विश्वासानुसार, हे भाग्यवान मुलाच्या जन्माचे प्रतीक आहे. दुसरीकडे, धार्मिक मान्यतेनुसार हत्ती खूप शुभ मानला जातो. हत्तीचीही पूजा केली जाते.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असंही आम्ही दावा करत नाही)

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या