मराठी बातम्या  /  धर्म  /  sankashti chaturthi :वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या तिथी, शुभ योग मुहूर्त व चंद्रोदय वेळ

sankashti chaturthi :वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या तिथी, शुभ योग मुहूर्त व चंद्रोदय वेळ

Dec 28, 2023, 01:17 PM IST

  • sankashti chaturthi December 2023 date and puja vidhi: सिद्धिदाता, बुद्धिदाता, सर्व गणांचा अधिपती, विनाशकारी गणपती बाप्पाचे पूजन भरपूर लाभदायक असते. प्रत्येक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी गणेश पूजनासाठी खास ठरते. या वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी तिथी, पूजा विधी व चंद्रोदय वेळ जाणून घ्या.

sankashti chaturthi

sankashti chaturthi December 2023 date and puja vidhi: सिद्धिदाता, बुद्धिदाता, सर्व गणांचा अधिपती, विनाशकारी गणपती बाप्पाचे पूजन भरपूर लाभदायक असते. प्रत्येक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी गणेश पूजनासाठी खास ठरते. या वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी तिथी, पूजा विधी व चंद्रोदय वेळ जाणून घ्या.

  • sankashti chaturthi December 2023 date and puja vidhi: सिद्धिदाता, बुद्धिदाता, सर्व गणांचा अधिपती, विनाशकारी गणपती बाप्पाचे पूजन भरपूर लाभदायक असते. प्रत्येक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी गणेश पूजनासाठी खास ठरते. या वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी तिथी, पूजा विधी व चंद्रोदय वेळ जाणून घ्या.

प्रत्येक महिन्यात शुक्ल व कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला फार महत्व आहे. शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या तिथीला सर्व देवतांच्या आधी पुजनीय अशा गणपती बाप्पाची पूजा केली जाते.

ट्रेंडिंग न्यूज

Weekly Festivals : बुद्ध पौर्णिमा ते एकदंत चतुर्थी… मे महिन्याच्या ‘या’ आठवड्यातील सणांची यादी, पाहा

Masik Pradosh Vrat : मे महिन्यात मासिक प्रदोष व्रत कधी? अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय? जाणून घ्या

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

दर महिन्यात येणाऱ्या चतुर्थी तिथीचे आगळे वेगळे महत्व आहे. यंदा वर्ष संपता संपताही आपल्याला गणेश पूजनाचा आणि व्रताचा लाभ मिळणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाची संकष्ट चतुर्थी शनिवार ३० डिसेंबर रोजी आहे.

संकष्टी चतुर्थी मुहूर्त

संकष्टी चतुर्थी ३० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजून ४३ मिनिटांनी सुरू होईल आणि ३१ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजून ५५ मिनिटापर्यंत राहील. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ८ वाजून ३ मिनिटे ते ९ वाजून ३० मिनिटापर्यंत आहे. संध्याकाळच्या पूजेचा शुभ मुहूर्त ६ वाजून १४ मिनिटे ते ७ वाजून ४६ मिनिटापर्यंत आहे.

संकष्टी चतुर्थी पूजा विधी

सूर्योदयाआधी उठून स्नानादी कार्य आटोपून घ्या. स्वच्छ कपडे घाला. देवपूजा करून घ्या यानंतर व्रताचा संकल्प घ्या. चौरंगावर लाल वस्त्र टाकून गणेश स्थापना करा. यानंतर दिवा, धूप, अगरबत्ती लावा. दूर्वा, फुले आणि नैवेद्य अर्पण करा. गणपतीची आरती करा. सायंकाळी चंद्रदेवाचे दर्शन करा.

शहराप्रमाणे चंद्रोदय वेळ

मुंबई - ९ वाजून ९ मिनिटे

ठाणे - ९ वाजून ८ मिनिटे

पुणे - ९ वाजून ५ मिनिटे

रत्नागिरी - ९ वाजून १० मिनिटे

कोल्हापूर - ९ वाजून ७ मिनिटे

सातारा - ९ वाजून ६ मिनिटे

नाशिक - ९ वाजून ३ मिनिटे

अहमदनगर - ९ वाजून १ मिनिटे

पणजी - ९ वाजून १० मिनिटे

धुळे - ८ वाजून ५८ मिनिटे

जळगाव - ८ वाजून ५४ मिनिटे

वर्धा - ८ वाजून ४२ मिनिटे

यवतमाळ - ८ वाजून ४५ मिनिटे

बीड - ८ वाजून ५७ मिनिटे

सांगली - ९ वाजून ५ मिनिटे

सावंतवाडी - ९ वाजून १० मिनिटे

सोलापूर - ८ वाजून ५८ मिनिटे

नागपूर - ८ वाजून ३९ मिनिटे

अमरावती - ८ वाजून ४५ मिनिटे

अकोला - ८ वाजून ४९ मिनिटे

छत्रपती संभाजी नगर(औरंगाबाद) - ८ वाजून ५७ मिनिटे

भुसावळ - ८ वाजून ५३ मिनिटे

परभणी - ८ वाजून ५२ मिनिटे

नांदेड - ८ वाजून ५० मिनिटे

उस्मानाबाद - ८ वाजून ५७ मिनिटे

भंडारा - ८ वाजून ३७ मिनिटे

चंद्रपूर - ८ वाजून ४१ मिनिटे

बुलढाणा - ८ वाजून ५३ मिनिटे

इंदौर - ८ वाजून ५० मिनिटे

ग्वाल्हेर - ८ वाजून ३४ मिनिटे

बेळगाव - ९ वाजून ७ मिनिटे

मालवण - ९ वाजून ११ मिनिटे

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या