मराठी बातम्या  /  धर्म  /  Ravivar Upay : पैशांची चिंता सतावतेय?, मग रविवारी करा हे खास उपाय

Ravivar Upay : पैशांची चिंता सतावतेय?, मग रविवारी करा हे खास उपाय

Jan 29, 2023, 09:29 AM IST

  • Money Problem : जर ग्रहांच्या राजाला प्रसन्न केलं तर आर्थिक चणचणींपासून मुक्ती नक्की मिळू शकते.

भगवान सूर्यदेव (हिंदुस्तान टाइम्स)

Money Problem : जर ग्रहांच्या राजाला प्रसन्न केलं तर आर्थिक चणचणींपासून मुक्ती नक्की मिळू शकते.

  • Money Problem : जर ग्रहांच्या राजाला प्रसन्न केलं तर आर्थिक चणचणींपासून मुक्ती नक्की मिळू शकते.

आपल्या धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे. ग्रहांचा राजा म्हणून सूर्य ग्रहाला पाहिलं जातं. आजचा दिवस याच ग्रहांच्या राजाला समर्पित दिवस आहे. मग जर ग्रहांच्या राजाला प्रसन्न केलं तर आर्थिक चणचणींपासून मुक्ती नक्की मिळू शकते. काही लोकं सूर्याला नियमित जल अर्पण करताना पाहायला मिळतात. चला तर पाहूया आर्थिक चणचणीपासून मुक्ती मिळवण्याचे रविवारचे उपाय.

ट्रेंडिंग न्यूज

Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय? जाणून घ्या

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

Sita Navami : सीता नवमी कधी आहे? जाणून घ्या तिथीचे महत्व, पूजनाची योग्य पद्धत, मंत्र आणि स्तोत्र

रविवारी करा हे उपाय

  • आर्थिक संकटातून सुटका मिळवण्यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात कुंकू मिसळून रविवारी वटवृक्षावर अर्पण करा. हा उपाय नियमित केल्याने तुम्हाला पैसे मिळू लागतील.
  • संपत्तीत वाढ हवी असल्यास रविवारी रात्री उशीजवळ एक ग्लास दूध ठेवा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यावर ते बाभळीच्या झाडावर प्रवाहित करा. हा उपाय तुमच्या आयुष्यात पैसे वाढवण्यासाठी उपयोगी पडेल.
  • रविवारी सकाळी स्नान करून सर्वप्रथम सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. हा उपाय केल्याने पैशाची समस्या दूर होईल.
  • रविवारी भगवान सूर्याची उपासना करण्याबरोबरच आदित्यहृदय स्त्रोत पाठ करा आणि विविध सूर्य मंत्रांचा जप करा. हा उपाय तुमच्यासाठी फलदायी ठरू शकतो.
  • रविवारी शुद्ध कस्तुरी पिवळ्या चमकदार रंगाच्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.
  • रविवारी काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना कपाळावर चंदनाचा टिळा लावणे फायदेशीर मानले जाते.
  • रविवारी लाल रंगाच्या वस्तू गरिबांना दान केल्याने धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. हा उपाय केल्याने तुम्हाला सूर्यदेवाची विशेष कृपा प्राप्त होते.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या