मराठी बातम्या  /  धर्म  /  Marriage : एक विधी असाही, ज्याशिवाय पूर्णत्वाला जात नाही विवाह

Marriage : एक विधी असाही, ज्याशिवाय पूर्णत्वाला जात नाही विवाह

Feb 07, 2023, 03:37 PM IST

  • Marriage Hindu Tradition : लग्नात एक विधी असा आहे जो झाला नाही तर लग्न पूर्ण होत नाही. वधू-वर त्याविधीशिवाय नवरा बायको म्हणून एकत्र येऊच शकत नाहीत.

विवाहातला सर्वात महत्वाचा विधी कोणता (हिंदुस्तान टाइम्स)

Marriage Hindu Tradition : लग्नात एक विधी असा आहे जो झाला नाही तर लग्न पूर्ण होत नाही. वधू-वर त्याविधीशिवाय नवरा बायको म्हणून एकत्र येऊच शकत नाहीत.

  • Marriage Hindu Tradition : लग्नात एक विधी असा आहे जो झाला नाही तर लग्न पूर्ण होत नाही. वधू-वर त्याविधीशिवाय नवरा बायको म्हणून एकत्र येऊच शकत नाहीत.

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम ।

ट्रेंडिंग न्यूज

Chaturmas 2024 : या तारखेपासून सर्व शुभ कार्य थांबतील, जाणून घ्या चातुर्मास कधी सुरू होतोय

Buddha Purnima Wishes : बुद्धं शरणं गच्छामि; बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्रियजणांना द्या अशा खास शुभेच्छा

vaishakh purnima upay : वैशाख पौर्णिमेला करा 'हे' सरळ उपाय, लक्ष्मीकृपेनं होईल तुमची भरभराट

Vat Savitri Purnima 2024 : वट सावित्री व्रत कधी आहे? नेमकी तारीख आणि पूजेची शुभ वेळ जाणून घ्या

बल्लाळो मुरुडम विनायकमहम चिन्तामणि स्थेवरम।

लेण्याद्री गिरीजात्मकम सुरवरदम विघ्नेश्वरम् ओझरम ।

ग्रामो रांजण संस्थीतम गणपति।

कुर्यात सदा मंगलम, शुभ मंगल सावधान।।

अशी मंगलाष्टकं कानावर पडतात, ‘सावधान’ असं म्हणताक्षणी ते दोन जीव लग्नाच्या अत्यंत महत्वाच्या सूत्रात बांधले जातात. यातला ‘सावधान’ हा शब्द ‘पुढे येणाऱ्या सर्व चांगल्या वाईट प्रसंगी एकमेकांना सावध होऊन सांभाळा’ अशा अर्थाचा असतो. टाळ्यांच्या गजरात या दोघांचं विवाह संस्थेत स्वागत केलं जातं. मग आजन्म ती दोघं एकमेकांबरोबर आयुष्य काढतात. मात्र लग्नात एक विधी असा आहे जो झाला नाही तर लग्न पूर्ण होत नाही. वधू-वर त्या विधीशिवाय नवरा बायको म्हणून एकत्र येऊच शकत नाहीत.

सप्तपदी म्हणजे काय

लग्नात सात फेऱ्यांनंतर सप्तपदी विधी केला जातो. या विधीमध्ये वधू-वरांसमोर तांदळाच्या ७ राशी ठेवल्या जातात. सात मंत्रांच्या जपाने त्याबाजूला सारल्या जातात. प्रत्येक मंत्रानंतर तांदळांचा तो ढीग पायाच्या अंगठ्याने वधू बाजूला काढते. तांदळच्या या सात राशी म्हणजे एकमेकांना दिलेली सात वचनं आहेत. यापैकी पहिला मंत्र अन्नासाठी, दुसरा बळासाठी, तिसरा संपत्तीसाठी, चौथा आनंदासाठी, पाचवा कुटुंबासाठी, सहावा अनुष्ठानासाठी आहे.सातवा मंत्र मैत्रीचा आहे. या मंत्रांद्वारे पती-पत्नीने सुखी जीवन जगावे अशी अपेक्षा असते.एकमेकांना त्याचं वचन देत ती राशी बाजूला सारली जाते.

वधू उजव्या बाजूला बसते आणि बायको डाव्या बाजूला बसते असं का

सप्तपदी समारंभात वधू वराच्या उजव्या बाजूला बसते आणि या समारंभानंतर पत्नीला डावीकडे बसवले जाते कारण या समारंभानंतर वधू पत्नी बनते. पत्नीला वामांगी म्हणतात. वामांगी म्हणजे डाव्या अवयवाची मालकी; पत्नीला पतीच्या डाव्या अवयवाची मालकी म्हणतात. यामुळेच कोणत्याही पूजा आणि विधीमध्ये पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला बसवले जाते. यामागचे कारण असे की शक्तीची उत्पत्ती भगवान शंकराच्या डाव्या भागातून झाली आहे.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या