मराठी बातम्या  /  धर्म  /  Margashirsha 2023 : कधी सुरू होतोय मार्गशीर्ष महिना? जाणून घ्या या महिन्यातील गुरुवारच्या व्रताचं महत्त्व

Margashirsha 2023 : कधी सुरू होतोय मार्गशीर्ष महिना? जाणून घ्या या महिन्यातील गुरुवारच्या व्रताचं महत्त्व

Dec 04, 2023, 02:47 PM IST

  • Margashirsha 2023 Guruvar vrat date and puja vidhi : मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या उपवासाला खास महत्त्व आहे. 

Margashirsha 2023 Date And Puja Vidhi

Margashirsha 2023 Guruvar vrat date and puja vidhi : मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या उपवासाला खास महत्त्व आहे.

  • Margashirsha 2023 Guruvar vrat date and puja vidhi : मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या उपवासाला खास महत्त्व आहे. 

Margashirsha 2023 Date And Puja Vidhi: कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो. हिंदू कॅलेंडरनुसार हा नववा महिना आहे. ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे, कार्तिक महिना भगवान विष्णूला समर्पित आहे, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. तसेच, मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या उपवासाला खास महत्त्व आहे. जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्याचे महत्व, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या तारखा आणि पूजा पद्धत..

ट्रेंडिंग न्यूज

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

Sita Navami : सीता नवमी कधी आहे? जाणून घ्या तिथीचे महत्व, पूजनाची योग्य पद्धत, मंत्र आणि स्तोत्र

Sambhaji Maharaj Jayanti : महान योद्धा आणि अतुलनीय रणनीती कौशल्य… संभाजी राजांनी १२० युद्धं लढली, एकही पराभव नाही

हिंदू कॅलेंडरच्या नवव्या महिन्यात देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी व्रत पाळले जाते. यासोबतच संपत्ती आणि समृद्धीची देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रताचा अवघ्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते आणि त्यासोबतच जीवनात धन, यश आणि सुख-समृद्धी येते. तसेच, जीवनातील सर्व समस्या दूर होऊन, धन-समृद्धीने आयुष्य सुखी होते. मार्गशीर्ष महिना अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच यंदा बुधवार १३ डिसेंबरपासून सुरू होत आहे. पहिला गुरुवार १४ डिसेंबर, दुसरा गुरुवार २१, तिसरा गुरुवार २८ डिसेंबर आणि चौथा गुरुवार ४ जानेवारी रोजी आहे.

Bhagavad Gita Updesh: गीतेमधील 'या' पाच गोष्टी अंगीकार करा; कधीच, कुठेही अपयश येणार नाही!

मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व

प्राचीन धार्मिक ग्रंथांनुसार मार्गशीर्ष महिना धार्मिक कार्यांसाठी विशेष मानला गेला आहे, म्हणून हा महिना अतिशय शुभ मानला जातो. या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले, असेहे म्हटले जाते. त्यामुळे या महिन्यात उपासनेसारखे शुभ कार्य अधिक फलदायक ठरते. मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते. असे म्हटले जाते की, मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो. लक्ष्मीदेवीच्या कृपेने सुख, समृद्धी आणि संपत्ती येते. नवविवाहित जोडपेही या दिवशी लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उपवास करतात.

जाणून घेऊया गुरुवार महालक्ष्मी व्रत पूजेची पद्धत:

- सर्वप्रथम सकाळी उठून सर्व कामे उरकून, आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला.

- श्रीगणेशाचे आणि माता लक्ष्मीचे ध्यान करा आणि व्रत-उपासनेचा संकल्प करा. चौरंगावर स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र ठेवून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करा.

- यानंतर कलशात पाणी भरून त्यात सुपारी, दुर्वा, अक्षता आणि नाणे टाकावे.

- आता कलशावर पाच विड्याची,आंब्याची किंवा अशोकाची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवा.

- नंतर काही तांदूळ चौरंगावर पसरवा आणि त्यावर कलश स्थापित करा.

- आता हळद-कुंकू आणि फुलांचा हार अर्पण करून कलशाची पूजा करा.

- त्यानंतर देवीच्या मूर्तीला हळद आणि कुंकू लावून सजवा.

- फुले, हार, अगरबत्ती आणि गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करून लक्ष्मीची पूजा करा.

- देवी लक्ष्मीला प्रसाद म्हणून मिठाई, खीर आणि फळे अर्पण करा.

- व्रताच्या दिवशी महालक्ष्मी व्रताची कथा वाचा किंवा ऐका. देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करा.

- व्रताची कथा संपल्यानंतर देवी लक्ष्मीची आरती करून सर्वांना प्रसाद वाटा.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या