मराठी बातम्या  /  धर्म  /  Margashirsha Guruvar: महालक्ष्मीचे गुरुवार करताना काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या

Margashirsha Guruvar: महालक्ष्मीचे गुरुवार करताना काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या

Dec 20, 2023, 06:20 PM IST

    • Margashirsha Guruvar Puja: वर्षातून एकदा येणारे मार्गशीष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केल्या जाणारे व्रत वैकल्यला फार महत्व आहे. जाणून घ्या व्रताची संपूर्ण पूजा विधी.
Margashirsha Guruvar Mahalakshmi Vrat

Margashirsha Guruvar Puja: वर्षातून एकदा येणारे मार्गशीष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केल्या जाणारे व्रत वैकल्यला फार महत्व आहे. जाणून घ्या व्रताची संपूर्ण पूजा विधी.

    • Margashirsha Guruvar Puja: वर्षातून एकदा येणारे मार्गशीष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केल्या जाणारे व्रत वैकल्यला फार महत्व आहे. जाणून घ्या व्रताची संपूर्ण पूजा विधी.

मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यासाठी खास असतो. कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धीकारक ठरतात. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार, मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्त जयंती या व्रत आणि सण-उत्सवाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय? जाणून घ्या

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

Sita Navami : सीता नवमी कधी आहे? जाणून घ्या तिथीचे महत्व, पूजनाची योग्य पद्धत, मंत्र आणि स्तोत्र

मार्गशीष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करू शकता. या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास ठेवत असतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करून, कथेचे पठन आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात. हे व्रत केल्याने मनातील इच्छा, पूर्ण होतात, घरामध्ये सुख शांती लाभते. आपल्या घरी सुख,शांती, तसेच मनातील सर्व इच्छा आकांशा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने करावे, श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावरही कायम कृपा करेल.

Shri Guru Charitra Parayan: श्रीगुरूचरित्र पारायण करताना हे नियम माहित असावे, जाणून घ्या

महालक्ष्मी व्रत कसे करावे

पहाटे लवकर उठून आंघोळ करावी, स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताचा संकल्प घ्यावा. अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी. त्यामध्ये माता लक्ष्मीचे पावलं अवश्य काढावी. यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे. माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याचे पान, करवंदाचे पान आणि भाताच्या पारंब्या वापरा.यानंतर कलश स्थापित करा. सर्व प्रथम कलश आणि गणेशाची पूजा करा. यानंतर लक्ष्मीची पूजा करावी. कलशाला हळद-कुंकु लावून कलशात दूर्वा, एक नाणं आणि सुपारी ठेवा. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवा. त्यानंतर एक नारळ ठेवा. चौरंगावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवा. कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवा. माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करा. असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा लावा. घराबाहेर आणि अंगणातही दिवा ठेवा. पूजेनंतर प्रसाद वाटून द्यावा. मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार असे व्रत करावे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करावे. उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजुबाजूच्या महिलांना बोलवून त्यांना महालक्ष्मीचे पुस्तक, एक केळे, एक रुपया देऊन हळद-कुंकू द्यावे.

Margashirsha guruvar: उद्या दुसरा मार्गशीर्ष गुरुवार; या उपायांनी होईल धनसमृद्धी, येणारे संकट टळेल

व्रत करणाऱ्यांनी ही काळजी घ्या

व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण, मांसाहार टाळावा.

हे व्रत करणार्‍यां स्त्रियांनी केवळ पाणी, दूध आणि फळांचे सेवन करावे.

रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करावे.

पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं.

व्रताच्या दिवशी घरातील वातावण आनंदी असावं.

एखादी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे, परंतू उपवास आपणच करावा.

वाद भांडण करू नये. बोलताना चुकीचे शब्द वापरू नये.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या