मराठी बातम्या  /  धर्म  /  Margashirsha guruvar: उद्या दुसरा मार्गशीर्ष गुरुवार; या उपायांनी होईल धनसमृद्धी, येणारे संकट टळेल

Margashirsha guruvar: उद्या दुसरा मार्गशीर्ष गुरुवार; या उपायांनी होईल धनसमृद्धी, येणारे संकट टळेल

Dec 20, 2023, 03:46 PM IST

    • Margashirsha Guruvar: मार्गशीर्ष महिना आला की गुरुवारचे व्रत सुरु होते. मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार २१ डिसेंबर रोजी असून, जाणून घ्या यादिवशी काय केल्याने लक्ष्मी प्रसन्न होईल आणि येणारे संकट टळेल.
Margashirsha Guruvar

Margashirsha Guruvar: मार्गशीर्ष महिना आला की गुरुवारचे व्रत सुरु होते. मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार २१ डिसेंबर रोजी असून, जाणून घ्या यादिवशी काय केल्याने लक्ष्मी प्रसन्न होईल आणि येणारे संकट टळेल.

    • Margashirsha Guruvar: मार्गशीर्ष महिना आला की गुरुवारचे व्रत सुरु होते. मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार २१ डिसेंबर रोजी असून, जाणून घ्या यादिवशी काय केल्याने लक्ष्मी प्रसन्न होईल आणि येणारे संकट टळेल.

मार्गशीर्ष महिना धार्मिक दृष्टीकोनातून फार महत्वाचा मानला जातो.धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे. या महिन्यात अनेक प्रकारचे धार्मिक विधी केले जातात. यासोबतच काही खास देवी-देवतांचीही पूजा केली जाते. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारचे स्वतःमध्ये खूप महत्त्व आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

Sita Navami : सीता नवमी कधी आहे? जाणून घ्या तिथीचे महत्व, पूजनाची योग्य पद्धत, मंत्र आणि स्तोत्र

Sambhaji Maharaj Jayanti : महान योद्धा आणि अतुलनीय रणनीती कौशल्य… संभाजी राजांनी १२० युद्धं लढली, एकही पराभव नाही

बुधवार १३ डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. १४ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार होता तर उद्या २१ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे. २८ डिसेंबर, ४ जानेवारी अनुक्रमे तिसरा आणि चौथा गुरुवार आहे. ११ जानेवारी २०२४ रोजी शेवटचा गुरुवार असून, याच दिवशी मार्गशीर्ष अमावस्याने हा महिना संपेल.

बहुतांश ठिकाणी स्त्रिया मार्गशीर्ष गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत करताना दिसतात. यावेळी लक्ष्मीची पूजा करुन उपवास करण्याची पद्धत आहे. तसेच सवाष्णींना वाण देण्यालाही मार्गशीर्ष महिन्यात विशेष महत्त्व आहे.

हे उपाय ठरतील लाभदायक

मान्यतेनुसार या दिवशी पृथ्वीवर लक्ष्मीदेवीचा वास असतो. यामुळे देवी लक्ष्मी ज्यांच्याघरी स्वच्छता असेल त्यांच्यावरच प्रसन्न होते.यामुळे घर नेहमी स्वच्छ असावे याची दक्षता घ्यावी.

या दिवशी घराच्या अंगणात रांगोळी काढावी, यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते. गुरुवारी लक्ष्मी देवीचे पाऊले आपल्या मुख्य दाराच्या उंबरठ्यावर लावावे, असे करणे फार शुभ आहे. यामुळे धनलाभ होतो असे सांगितले जाते.

लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करावी. यादिवशी लक्ष्मी देवीला खीर नैवेद्य म्हणून अर्पण करावे. तसेच भगवान विष्णूंना गुड आणि चने अर्पण करावे.

मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी गायीला गुड, चन्याची डाळ आणि हळद मिसळून खाऊ घालावे, यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात. या दिवशी गायीला टिळा लावून गायीची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात.

रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो.

मार्गशीर्ष महिन्यात तुमच्या भक्तीभावाने देवी लक्ष्मीला प्रसन्न केले तर असे मानले जाते की, अशा लोकांवर गरिबी कधीच राहत नाही आणि महालक्ष्मीचा सदैव आशीर्वाद त्या भक्तावर राहतो.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या