मराठी बातम्या  /  धर्म  /  Magh Purnima 2023 : 'हे' आहेत माघ पौर्णिमेचे शुभ मुहूर्त, अशी कराल पूजा

Magh Purnima 2023 : 'हे' आहेत माघ पौर्णिमेचे शुभ मुहूर्त, अशी कराल पूजा

Feb 01, 2023, 10:38 AM IST

  • Magh Purnima Shubh Muhurta 2023 : या दिवशी चंद्र आपल्या १६ कलांनी परिपूर्ण असतो.माघ पौर्णिमेचे शुभ मुहूर्त कोणते आहेत आणि माघ पौर्णिमा कशी करावी.

माघ पौर्णिमा (हिंदुस्तान टाइम्स)

Magh Purnima Shubh Muhurta 2023 : या दिवशी चंद्र आपल्या १६ कलांनी परिपूर्ण असतो.माघ पौर्णिमेचे शुभ मुहूर्त कोणते आहेत आणि माघ पौर्णिमा कशी करावी.

  • Magh Purnima Shubh Muhurta 2023 : या दिवशी चंद्र आपल्या १६ कलांनी परिपूर्ण असतो.माघ पौर्णिमेचे शुभ मुहूर्त कोणते आहेत आणि माघ पौर्णिमा कशी करावी.

Magh Purnima Shubh Muhurta 2023

ट्रेंडिंग न्यूज

Masik Pradosh Vrat : मे महिन्यात मासिक प्रदोष व्रत कधी? अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय? जाणून घ्या

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

४ फेब्रुवारी २०२३ रोजी माघ महिन्यातली पौर्णिमा सुरु होणार आहे. ही पौर्णिमा फक्त धार्मिकच नव्हे तर ज्योतिषीय दृष्टीकोनातूनही अत्यंत महत्वाची मानली गेली आहे. या दिवशी चंद्र आपल्या १६ कलांनी परिपूर्ण असतो. या दिवशी चंद्र स्वतःच्या राशीत कर्क राशीत प्रवेश करतो. असे मानले जाते की या दिवशी स्वर्गातील सर्व देवी-देवता पृथ्वीवर येतात आणि गंगेत स्नान करतात. माघ पौर्णिमेचे शुभ मुहूर्त कोणते आहेत आणि माघ पौर्णिमा कशी करावी हे आपण जाणून घेणार आहोत.

माघ पौर्णिमा २०२३ शुभ मुहूर्त

माघ पौर्णिमा सुरू होते: ४ फेब्रुवारी २०२३ शनिवारी रात्री ९.२८ वाजता

माघ पौर्णिमा समाप्ती: रविवार ५ फेब्रुवारी २०२३ रात्री ११.५९ वाजता

माघ पौर्णिमेच्या दिवशी काय करावं

माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. म्हणूनच या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तींना घोंगडी,फळे इत्यादी वस्तूंचे दान करावे. असे केल्याने तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल.

माघ पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी जो व्यक्ती पवित्र नदीत स्नान करतो. त्याला मोक्ष मिळतो. तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर शास्त्रानुसार या दिवशी घरी भगवान सत्यनारायणाची कथा सांगण्याचा नियम आहे.

माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. कारण भगवान विष्णू पिंपळाच्या झाडावर वास करतात असे मानले जाते. म्हणूनच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा. असे केल्याने पितरही प्रसन्न होतील.

या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला दूध आणि गंगेच्या पाण्याने अभिषेक करा. तसेच श्री सुक्तमचे पठण करावे. असे केल्याने तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त होईल.

माघ पौर्णिमेला जाळून येतायत हे खास योग

माघ पौर्णिमेच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी, आश्लेषा नक्षत्र आणि पुष्य नक्षत्र यांचा संयोग होत आहे. हे संयोग अत्यंत शुभ मानले गेले आहेत.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या