मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh : आयुष्यात केलेल्या या तीन गोष्टींची किंमत चुकवावीच लागते, असं का म्हणतात श्रीकृष्ण?

Geeta Updesh : आयुष्यात केलेल्या या तीन गोष्टींची किंमत चुकवावीच लागते, असं का म्हणतात श्रीकृष्ण?

Aug 05, 2023, 04:07 AM IST

  • Shree Krishna Arjun Samvaad : महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता. हिंदू धर्मात गीतेचं महत्व अनन्य साधारण आहे.

गीता उपदेश (Pixabay )

Shree Krishna Arjun Samvaad : महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता. हिंदू धर्मात गीतेचं महत्व अनन्य साधारण आहे.

  • Shree Krishna Arjun Samvaad : महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता. हिंदू धर्मात गीतेचं महत्व अनन्य साधारण आहे.

महाभारत हा हिंदू सभ्यता आणि संस्कृतीचा पवित्र ग्रंथ आहे. त्याचा आधार अधर्माशी धर्माच्या लढाईवर आहे. त्याला पाचवा वेद असेही म्हणतात. 'श्रीमद्भगवद्गीता' आणि महाभारतातील 'विदुर नीति' हे त्याचे दोन स्तंभ आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

Sita Navami : सीता नवमी कधी आहे? जाणून घ्या तिथीचे महत्व, पूजनाची योग्य पद्धत, मंत्र आणि स्तोत्र

Sambhaji Maharaj Jayanti : महान योद्धा आणि अतुलनीय रणनीती कौशल्य… संभाजी राजांनी १२० युद्धं लढली, एकही पराभव नाही

महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता. हिंदू धर्मात गीतेचं महत्व अनन्य साधारण आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल हे उपदेश आजच्या काळातही माणसाला त्याच्या कर्तव्यांची माहिती करून देतं. आपल्याच नातेवाईकांविरोधात युद्ध करण्यापूर्वी अर्जुनाचे हातपाय गळले होते. मी माझ्याच नातलगांविरोधात युद्ध कसं करू शकतो असा प्रश्न त्याला पडला होता. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्ण अर्जुनाला देतो.

काय म्हणतात श्रीकृष्ण?

श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की खोटे, कपट आणि बहाणे बनवणं तुम्हाला काही काळासाठी सुख देईल, परंतु भविष्यात तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागेल. म्हणूनच प्रत्येकाने आयुष्यात या तीन गोष्टी करणं टाळल्या पाहिजेत.

श्रीमद्भागवत गीतेमध्ये असे लिहिले आहे की मनुष्याने सुखाच्या वेळी कधीही अहंकार बाळगू नये आणि दु:खाच्या वेळी भगवंताचा सहवास सोडू नये.

भक्ती आणि भावनेने वाहणारे अश्रू हे देवाने तुम्हाला स्पर्श केल्याचे प्रतीक आहे. माणूस कितीही बलवान असला तरी तो आतून किती कमकुवत आहे हे फक्त श्रीकृष्णालाच माहीत आहे.

जेव्हा देव एखाद्यावर आशीर्वाद देतो तेव्हा तो त्याला मानवी रूप देतो. मानवी योनी अमूल्य आहे कारण या स्वरूपात मोक्ष प्राप्त करणे शक्य आहे.

जीवनातील हे तीन मंत्र प्रत्येकाने लक्षात ठेवावे. आनंदात कधीही कोणाला वचन देऊ नये, रागाच्या भरात कोणालाच उत्तर देऊ नये आणि दुःखात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नये.

गीतेमध्ये लिहिले आहे की आयुष्यात अनेकवेळा आपण मोठमोठ्या अडचणींतून अशा प्रकारे बाहेर पडतो की जणू कोणीतरी आपल्याला साथ देत आहे..या अदृश्य शक्तीचे नाव म्हणजेच देव.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या