मराठी बातम्या  /  धर्म  /  Geeta Updesh : ‘जो इतरांवर विश्वासला, त्याचा कार्यभाग बुडाला’

Geeta Updesh : ‘जो इतरांवर विश्वासला, त्याचा कार्यभाग बुडाला’

Jul 30, 2023, 06:15 AM IST

  • Shree Krishna Arjun Samvaad : महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता. हिंदू धर्मात गीतेचं महत्व अनन्य साधारण आहे.

गीता उपदेश (pixabay)

Shree Krishna Arjun Samvaad : महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता. हिंदू धर्मात गीतेचं महत्व अनन्य साधारण आहे.

  • Shree Krishna Arjun Samvaad : महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता. हिंदू धर्मात गीतेचं महत्व अनन्य साधारण आहे.

महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता. हिंदू धर्मात गीतेचं महत्व अनन्य साधारण आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल हे उपदेश आजच्या काळातही माणसाला त्याच्या कर्तव्यांची माहिती करून देतं. आपल्याच नातेवाईकांविरोधात युद्ध करण्यापूर्वी अर्जुनाचे हातपाय गळले होते. मी माझ्याच नातलगांविरोधात युद्ध कसं करू शकतो असा प्रश्न त्याला पडला होता. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्ण अर्जुनाला देतो.

ट्रेंडिंग न्यूज

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

Sita Navami : सीता नवमी कधी आहे? जाणून घ्या तिथीचे महत्व, पूजनाची योग्य पद्धत, मंत्र आणि स्तोत्र

Sambhaji Maharaj Jayanti : महान योद्धा आणि अतुलनीय रणनीती कौशल्य… संभाजी राजांनी १२० युद्धं लढली, एकही पराभव नाही

१८ अध्याय आणि सुमारे ७२० श्लोक गीतेत सांगण्यात आले आहेत. आज त्यातल्या काही उपदेशांना आपण पाहाणार आहोत.

काय सांगतात श्रीकृष्ण?

गीतेनुसार, भूतकाळ आपल्याला जीवन समजून घेण्याची चांगली संधी देतो. श्री कृष्ण म्हणतात की आपला भविष्यकाळ आपल्याला जगण्याची दुसरी संधी देतो. त्यामुळेच आजचा दिवस कसलीही चिंता न करता जगला पाहिजे.

श्रीकृष्ण म्हणतात की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही, खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगली बुद्धी, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. या गुणांशिवाय माणूस नेहमीच गरीब राहतो.

श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की, अत्याधिक आराम आणि अत्याधिक प्रेम माणसाला अपंग बनवते. म्हणूनच एखाद्याने जास्त आराम आणि प्रेम करणे टाळले पाहिजे, अन्यथा व्यक्ती आपले आयुष्य उध्वस्त करते.

गीतेत म्हटले आहे की माणूस एकटाच जन्मतो आणि एकटाच मरतो. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या चांगल्या-वाईट कर्मांची फळे मिळतात. म्हणूनच लोकांच्या झुंडीत चालण्याऐवजी, एखाद्याने स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे आणि एकटे चालण्यास घाबरू नये.

श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही बलवान बनता. याउलट, हा विश्वास इतरांवर ठेवला, तर तो मूर्खपणा ठरतो. तुम्ही केव्हा बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही मात्र तुम्ही कधी चूक होतात हे कोणीही विसरत नाही.

गीतेनुसार काळ केव्हा आणि कोणता रंग दाखवेल हे कोणालाच माहीत नाही. श्रीरामांना रात्री राज्य मिळणार होते पण पहाटेच त्यांना वनवास मिळाला. म्हणूनच वेळेवर विश्वास ठेवून काम करत राहावे.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या