मराठी बातम्या  /  धर्म  /  Dharma News : १४ वर्षांच्या वनवासाने एकाला मिळाली शक्ती तर दुसऱ्याला मिळाली मुक्ती

Dharma News : १४ वर्षांच्या वनवासाने एकाला मिळाली शक्ती तर दुसऱ्याला मिळाली मुक्ती

May 09, 2023, 11:34 AM IST

  • Ramayana Motivational Story : कैकैयीचा अत्यंत प्रिय पुत्र म्हणजे श्रीराम. मग आपल्या प्रिय पुत्राला १४ वर्षांच्या वनवासाला एका आईने का पाठवलं त्याचा वेध घेणारी ही पुराणकथा.

श्रीराम (HT)

Ramayana Motivational Story : कैकैयीचा अत्यंत प्रिय पुत्र म्हणजे श्रीराम. मग आपल्या प्रिय पुत्राला १४ वर्षांच्या वनवासाला एका आईने का पाठवलं त्याचा वेध घेणारी ही पुराणकथा.

  • Ramayana Motivational Story : कैकैयीचा अत्यंत प्रिय पुत्र म्हणजे श्रीराम. मग आपल्या प्रिय पुत्राला १४ वर्षांच्या वनवासाला एका आईने का पाठवलं त्याचा वेध घेणारी ही पुराणकथा.

प्रभू रामचंद्रांना १४ वर्ष वनवासात पाठवणारी राणी कैकैयी. मात्र हा १४ वर्षांचा वनवास एक अखंड रामायण पाठ किंवा रामचरीत्र घडवून गेला हेही तितकंच खरं. एका युद्धात राजा दशरथाला महाराणी कैकैयी मदत करते आणि त्या युद्धातल्या विजयानंतर कोणतेही दोन वर माग असं राजा दशरथ आपल्या राणीला सांगतो. अगदी मोक्याच्या क्षणी रामाला १४ वर्ष वनवास आणि भरताचा राज्याभिषेक असं कैकैयी ठामपणे सांगते. मग घडतं ते रामायण.

ट्रेंडिंग न्यूज

Masik Pradosh Vrat : मे महिन्यात मासिक प्रदोष व्रत कधी? अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय? जाणून घ्या

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

श्रीराम कैकैयीचा सर्वात आवडता पुत्र असं वर्णन रामायणात आढळतं. मग आपल्या सर्वात प्रिय पुत्राला म्हणजेच रामाला वनवासाची शिक्षा कैकैयीने का दिली. त्यामागे कोणती योजना होती, हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

श्रीरामाला विष्णूचा अवतार म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. कैकैयी ही श्रीरामाची सावत्र आई. मात्र त्या आईचा आपल्या या मुलावर सख्ख्या आईपेक्षाही जास्त स्नेह होता. देवलोकात रावणावर विजय कसा मिळवायचा यावर मंथन सुरू होतं. अशावेळेस श्रीविष्णूंनी शनिदेवाला मदतीला घेतलं. शनिची महादशा रावणावर कधी येणार हे श्रीविष्णूंनी जाणून घेतलं आणि त्याप्रमाणे सर्व प्लान रचला गेला.

दुसरीकडे श्रीविष्णू यांनी रामाचा अवतार घेतल्यावर युवावस्थेत जेव्हा त्यांच्या राज्याभिषेकाची तयारी होईल तेव्हा देवी सरस्वतीने मंथरेच्या डोक्यात रामाला वनवास आणि भरताचा राज्याभिषेक ही कल्पना सोडायची आणि कैकैयीला मंथरेचं बोलणं ऐकल्यावर तिच्या सांगण्यावरून राजा दशरथाला असं करण्यास भाग पाडायचं असं श्रीविष्णूंनी सांगितलं.

ठरल्याप्रमाणे कैकैयीने राजा दशरथाकडे दोन वचनांची मागणी केली आणि राम वनवासाला निघाले. वनवासात पोहोचल्यावर सीता हरण झालं. त्याचवेळेस रावणावर शनिची महादशा आली. रावणाच्या आयुष्याचा कालखंड मोजका काळ होता. अशात सीताहरण झाल्यावर प्रभू श्रीरामांनी वानरांच्या साथीनं रावणाचा वध केला आणि लंका जिंकली.

कैकैयीला आपला मुलगा फक्त अयोध्येचा राजा व्हावा असं वाटत नव्हतं तर रामाचं नाव अवघ्या जगाने भक्तीने आणि आदराने घ्यावं असं वाटत होतं. झालंही तसंच १४ वर्षांच्या वनवासाने एकाला ही शक्ती मिळाली तर दुसऱ्याला मुक्ती मिळाली. 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या