मराठी बातम्या  /  धर्म  /  Weekly Festivals 2023 : रक्षाबंधन ते संकष्टी चतुर्थी, पाहा या आठवड्यातील प्रमुख सणांचं महत्त्व

Weekly Festivals 2023 : रक्षाबंधन ते संकष्टी चतुर्थी, पाहा या आठवड्यातील प्रमुख सणांचं महत्त्व

Aug 29, 2023, 11:24 AM IST

    • Weekly Hindu Festivals 2023 : ऑगस्टच्या अखेरीस आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला महत्त्वपू्र्ण सण येवून ठपलेत. त्यामुळं अनेकांनी त्यासाठीची तयारी सुरू केली आहे.
Weekly Hindu Festivals 2023 (HT)

Weekly Hindu Festivals 2023 : ऑगस्टच्या अखेरीस आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला महत्त्वपू्र्ण सण येवून ठपलेत. त्यामुळं अनेकांनी त्यासाठीची तयारी सुरू केली आहे.

    • Weekly Hindu Festivals 2023 : ऑगस्टच्या अखेरीस आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला महत्त्वपू्र्ण सण येवून ठपलेत. त्यामुळं अनेकांनी त्यासाठीची तयारी सुरू केली आहे.

Weekly Hindu Festivals 2023 : सध्या श्रावण महिना सुरू असल्याने अनेक लोक उपवास ठेवून देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत आहे. सुखशांती, धनप्राप्ती तसेच अन्य मनोकामना पूर्ण करण्यासाठी अनेक लोक श्रावणात देवाला साकडं घालत असतात. परंतु आता ऑगस्टच्या अखेरीस आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला काही महत्त्वाचे सण वार येवून ठेपलेले आहे. त्यासाठी अनेकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महिनाखेर असल्याने अनेकांनी सुट्ट्या टाकत कुटुंबियांसोबत सणं साजरा करण्याचा प्लॅन आखला आहे. चालू आठवड्यात कोणते सण असतील आणि त्यांचं महत्त्व काय आहे?, जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

Masik Pradosh Vrat : मे महिन्यात मासिक प्रदोष व्रत कधी? अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय? जाणून घ्या

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

२८ ऑगस्ट - सोम प्रदोष व्रत

सोमवारी म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी सोम प्रदोष व्रत हा सण साजरा करण्यात आला आहे. याशिवाय याच दिवशी तिसरा श्रावण सोमवार असल्याने देशातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. सोम प्रदोष व्रत केल्यास महिलांना अपत्यप्राप्ती होत असते. मुलाबाळांची सुरक्षा तसेच पतीला करियरमध्ये यश अशा अनेक गोष्टींसाठी अनेक महिला सोम प्रदोष व्रत ठेवत असतात. याच काळात भगवान शंकराची पूजा देखील केली जाते.

३० ऑगस्ट - रक्षाबंधन सण

श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येत असतो. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधत असते. येत्या ३० ऑगस्टला सकाळी १०.१२ वाजता पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे. त्यानंतर भद्राकाळ सुरू होणार आहे. भद्राकाळात भावाला राखी बांधणं अशुभ मानलं जातं. त्यामुळं मुहूर्त पाहूनच लाडक्या भावाला राखी बांधायला हवी.

३१ ऑगस्ट - श्रावणी उपाकर्म

हिंदू धर्मातील श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी श्रावणी उपाकर्म हा सण साजरा करण्यात येत असतो. परंतु त्या दिवशी उदया तिथी असणं गरजेचं असतं. उदया तिथीला म्हणजेच ३० ऑगस्टला उत्तर भारतातील राज्यांमध्ये ब्राह्मणांमध्ये जानवं बदलण्याचा कार्यक्रम पार पाडला जातो. दक्षिणेत या विधीला अबित्तम असंही म्हटलं जातं.

०३ सप्टेंबर - संकष्टी चतुर्थी

कृष्ण पक्षाच्या संकष्टी चतुर्थीला गणेश चतुर्थी असंही म्हटलं जातं. तीन सप्टेंबरला येत असलेल्या संकष्टी चतुर्थीला अनेक लोक उपवास ठेवत गणरायाला सुख-समृद्धीचं साकडं घालत असतात. या दिवशी उपवास केल्यास व्यक्तीची बुद्धी वाढण्यास मदत होते. तसेच व्यक्तिमत्त्व विकास होत व्यक्तीच्या आयुष्यातील अडथळे दूर होण्यास मदत होत असल्याचं धर्मशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील बातम्या