मराठी बातम्या  /  धर्म  /  Garuda Purana : धनाशी संबंधित कोणत्या गोष्टींचा उल्लेख गरूड पुराणात केला गेला आहे

Garuda Purana : धनाशी संबंधित कोणत्या गोष्टींचा उल्लेख गरूड पुराणात केला गेला आहे

May 21, 2023, 05:07 AM IST

  • Garuda Puran Money : धनासंबंधी गरूड पुराणात काही दाखले देण्यात आले आहेत. या दाखल्यांनुसार श्रीमंतातली श्रीमंत व्यक्तीही काही नियम न पाळल्यास गरीब होऊ शकते किंंवा गरीबातली गरीब व्यक्तीही काही नियम पाळल्यास धनवान होऊ शकते असं सांगण्यात आलं आहे.

गरूड पुराण (Pinterest)

Garuda Puran Money : धनासंबंधी गरूड पुराणात काही दाखले देण्यात आले आहेत. या दाखल्यांनुसार श्रीमंतातली श्रीमंत व्यक्तीही काही नियम न पाळल्यास गरीब होऊ शकते किंंवा गरीबातली गरीब व्यक्तीही काही नियम पाळल्यास धनवान होऊ शकते असं सांगण्यात आलं आहे.

  • Garuda Puran Money : धनासंबंधी गरूड पुराणात काही दाखले देण्यात आले आहेत. या दाखल्यांनुसार श्रीमंतातली श्रीमंत व्यक्तीही काही नियम न पाळल्यास गरीब होऊ शकते किंंवा गरीबातली गरीब व्यक्तीही काही नियम पाळल्यास धनवान होऊ शकते असं सांगण्यात आलं आहे.

गरुडपुराण १८ महापुराणांपैकी एक म्हणून गरुडपुराणाकडे पाहिलं जातं.सनातन धर्मात गरुड पुराणाला अत्यंत महत्व दिलं गेलं आहे. गरुडपुराणात भगवान विष्णू पक्षीराज गरुडाला काय सांगतात याचा उल्लेख मिळतो. जीवनात घडणाऱ्या अनेक घटनांचं वर्णन आपल्याला गरूड पुराणात पाहायला मिळतं. गरूड पुराणात सांगितलेल्या गोष्टींप्रमाणे आचरण केल्यास व्यक्तीचं जीवन सुखी होतं. धनासंबंधी गरूड पुराणात काही दाखले देण्यात आले आहेत. या दाखल्यांनुसार श्रीमंतातली श्रीमंत व्यक्तीही काही नियम न पाळल्यास गरीब होऊ शकते किंंवा गरीबातली गरीब व्यक्तीही काही नियम पाळल्यास धनवान होऊ शकते असं सांगण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Masik Pradosh Vrat : मे महिन्यात मासिक प्रदोष व्रत कधी? अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय? जाणून घ्या

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

जीवनात दानधर्म करावा

पैशाबाबत गरुड पुराणात सांगितले आहे की, व्यक्तीने आपल्या कमाईचा काही भाग दानासाठी खर्च करावा. हे दान गरजूंना द्यावे. एखाद्या व्यक्तीने दान न केल्यास धनहानी सहन करावी लागते. पैसे खर्च करत राहणे देखील खूप महत्वाचे आहे. विनाकारण पैसा साठवू नये. माणसाने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुखसोयींसाठी पैसा खर्च केला पाहिजे.

महिलांचा आदर केला पाहिजे

गरूड पुराणात सांगितल्यानुसार महिलांचा आदर करणे अत्यंत आवश्यक आहे. संपत्ती हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. माता लक्ष्मीच्या अपमानामुळे पैसा लवकर संपतो.

इतरांची फसवणूक करणे टाळावे

गरूड पुराणात सांगितल्यानुसार लोभामुळे इतरांची संपत्ती आणि पैसा हिसकावून घेण्याचा विचार करणार्‍या व्यक्तींवर माता लक्ष्मी नेहमी क्रोधित होते. या लोकांना आयुष्यात कधीही सुख मिळत नाही.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या