मराठी बातम्या  /  धर्म  /  Garuda Purana : घरात का हातपाय पसरते गरीबी?, त्यामागची नेमकी कारणं काय आहेत?

Garuda Purana : घरात का हातपाय पसरते गरीबी?, त्यामागची नेमकी कारणं काय आहेत?

May 29, 2023, 08:32 AM IST

  • Garuda Purana On Poverty : अनेकदा खूप कामं करूनही काही व्यक्तींच्या घरात मात्र गरीबीच पसरलेली पाहायला मिळते. गरूड पुराणात व्यक्तींचं घर कसं असावं आणि त्यानं कोणती कर्म करावीत याबाबत सविस्तर सांगण्यात आलं आहे

काय सांगतं गरूड पुराण

Garuda Purana On Poverty : अनेकदा खूप कामं करूनही काही व्यक्तींच्या घरात मात्र गरीबीच पसरलेली पाहायला मिळते. गरूड पुराणात व्यक्तींचं घर कसं असावं आणि त्यानं कोणती कर्म करावीत याबाबत सविस्तर सांगण्यात आलं आहे

  • Garuda Purana On Poverty : अनेकदा खूप कामं करूनही काही व्यक्तींच्या घरात मात्र गरीबीच पसरलेली पाहायला मिळते. गरूड पुराणात व्यक्तींचं घर कसं असावं आणि त्यानं कोणती कर्म करावीत याबाबत सविस्तर सांगण्यात आलं आहे

गरुड पुराण हे भगवान विष्णूंनी त्यांच्या वाहन गरुडाच्या उत्सुकतेला शांत करण्यासाठी सांगितलेल्या गोष्टींचे संकलन आहे. गरुड पुराणात भगवान विष्णूंनी अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही कोणालाही सांगू नयेत, अन्यथा त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो

ट्रेंडिंग न्यूज

Astro Upay : पायात काळा धागा का बांधतात, याचा फायदा काय? जाणून घ्या

एका दिवसात किती भाविक चारधामचे दर्शन घेऊ शकतील? सध्या सर्व धामांचे हवामान कसे आहे? जाणून घ्या

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या रात्री घरात या ठिकाणी दिवे लावा, धनाची आवक वाढेल

Char Dham Yatra: अक्षय्य तृतीयेला सुरू होतेय चार धाम यात्रा! कसे आणि कुठे करावे ऑनलाईन रजिस्ट्रेशन?

या पुराणाचे प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत. यामध्ये भक्ती, ज्ञान, शांतता, सदाचार, नि:स्वार्थी कार्याच्या महिमाबरोबरच यज्ञ, दान, तपश्चर्या, तीर्थयात्रा इत्यादी शुभ कर्मांमध्ये सर्वसामान्यांना प्रवृत्त करण्यासाठी अनेक लौकिक व इतर ऐहिक फलांचे वर्णन केले आहे. याशिवाय आयुर्वेद, नीतिशास्त्र इत्यादी विषयांच्या वर्णनाबरोबरच मृत आत्म्याच्या शेवटच्या क्षणी करावयाच्या कृतींचे तपशीलवार वर्णन केले आहे. प्रबोधनाची चर्चा हा देखील त्याचा मुख्य विषय आहे.

घरात का हातपाय पसरते गरीबी?, त्यामागची नेमकी कारणं काय आहेत? याबद्दल गरूड पुराणात नेमकं काय सांगण्यात आलं आहे हे आपण आज पाहाणार आहोत.

घरात गरीबी पसरण्याची नेमकी कारणं काय आहेत.

अनेकदा खूप कामं करूनही काही व्यक्तींच्या घरात मात्र गरीबीच पसरलेली पाहायला मिळते. गरूड पुराणात व्यक्तींचं घर कसं असावं आणि त्यानं कोणती कर्म करावीत याबाबत सविस्तर सांगण्यात आलं आहे.

पती-पत्नीमधील वाद

कुटुंब पद्धतीत नवरा बायको आणि त्यांचा संसार आणि त्यांचे आईवडील, मुलं अशी समजली जाते. घरात कुटुंबाला पोषक वातावरण असायला हवं असं गरूड पुराण सांगतं. ज्या घरात पती-पत्नीमध्ये वारंवार कलह होत असतील त्या ठिकाणी त्यांच्या वादाने गरीबी जन्माला येते आणि जितका काळ त्यांच्यात वाद होत राहातील तितका काळ ही गरीबी हातपाय पसरते असंही यात सांगण्यात आलं आहे. घरातल्या स्त्री ला लक्ष्मीचं रुप आणि अन्नपूर्णेचं रुप मानलं जातं. त्यामुळे ज्या घरात कलह होतात, त्या घरात माता लक्ष्मी वास करत नाही.

घराचं मु्ख्य द्वार अस्वच्छ असणे

तुमच्या घराचा दरवाजा हे तुमच्या घराचं प्रतीक असतं. ज्या घरचे दरवाजे अस्वच्छ असतात त्या घरातही कायम दारीद्य वास करतं. जर घरात लक्ष्मीचा वर्षाव हवा असेल तर माणसाने घरच्या प्रवेशद्वाराला कायम स्वच्छ ठेवावं आणि रोज संध्याकाळी दिवा लावावा असं गरूड पुराणात सांगण्यात आलं आहे.

उष्टी भांडी ठेवणे

आपल्या घरात अनेकांना रात्रीची उष्टी भांडी तशीच ठेवून झोपण्याची सवय असते. मात्र हीच उष्टी भांडी रात्रभर तुमच्या घरात नकारात्मकता आणतात आणि गरिबीला तुम्ही आमंत्रण देता. त्यामुळे रात्री जेवल्यावर सर्व भांडी धुवावीत आणि मग झोपण्यास जावे असं गरूड पुराणात सांगितलं आहे.

सूर्यास्तानंतर घराची स्वच्छता करणे

घर स्वच्छ ठेवणे ही चांगली सवय आहे. पण सूर्यास्तानंतर घराची साफसफाई करू नये. त्यामुळे घराघरात गरिबी पसरते आणि आर्थिक संकट कोसळते. म्हणूनच सकाळी लवकर आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी घराची साफसफाई करावी.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या