मराठी बातम्या  /  धर्म  /  Birsa Munda Jayanti : अवघ्या २२ वर्षांचा मुलगा, ज्याने इंग्रजांच्या नाकी नऊ आणले होते!

Birsa Munda Jayanti : अवघ्या २२ वर्षांचा मुलगा, ज्याने इंग्रजांच्या नाकी नऊ आणले होते!

Nov 15, 2022, 11:11 AM IST

  • Freedom Fighter Birsa Munda Jayanti : आदिवासी समाजात बिरसा मुंडा यांना देव मानलं जातं. आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा यांची आज जयंती आहे. कोण होते बिरसा मुंडा जाणून घेऊया.

आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा (हिंदुस्तान टाइम्स)

Freedom Fighter Birsa Munda Jayanti : आदिवासी समाजात बिरसा मुंडा यांना देव मानलं जातं. आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा यांची आज जयंती आहे. कोण होते बिरसा मुंडा जाणून घेऊया.

  • Freedom Fighter Birsa Munda Jayanti : आदिवासी समाजात बिरसा मुंडा यांना देव मानलं जातं. आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा यांची आज जयंती आहे. कोण होते बिरसा मुंडा जाणून घेऊया.

आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी सध्याच्या झारखंडमधील खुंटी जिल्ह्यातील उलिहाटू गावात झाला.  इंग्रजांच्या शोषणाविरुद्ध बिरसा मुंडा यांनी आंदोलन केलं. त्यात त्यांना तुरूंगवास भोगावा लागला होता. बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरोधात आपल्या प्राणांची आहूती दिली त्यानंतर आदिवासी समाजात त्यांना देवाचा दर्जा प्राप्त झाला. आदिवासी समाजातील लोक त्यांची देवाप्रमाणे पूजा करतात. बिरसा मुंडा यांनी - राणीचे राज्य संपवा, आमचे साम्राज्य स्थापित करा असा नारा दिला होता. झारखंडमध्ये आजही लोकं त्यांना धरती आबा या नावाने हाक मारतात.

ट्रेंडिंग न्यूज

Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय? जाणून घ्या

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

Sita Navami : सीता नवमी कधी आहे? जाणून घ्या तिथीचे महत्व, पूजनाची योग्य पद्धत, मंत्र आणि स्तोत्र

बिरसा मुंडा आदिवासी क्रांतिकारक

झारखंड व्यतिरिक्त, लोक भगवान बिरसा मुंडा यांना बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, मध्य प्रदेश इत्यादी आदिवासीबहुल राज्यांमध्ये सर्वात मोठे क्रांतिकारक म्हणून ओळखतात.  इंग्रज राज्यकर्ते त्यांच्या नावाने हादरायचे. बिरसा मुंडा याच्या जन्माच्या वेळेस उलिहाटू गाव रांची, झारखंडचा एक भाग होतं. स्वतंत्र झारखंड राज्याच्या स्थापनेनंतर बिरसा मुंडा झारखंडचे ब्रँड बनले. त्यांच्या अनेक आठवणी झारखंड सरकारने जतन केल्या आहेत, ज्यासाठी देश-विदेशातील लोक भेटायला येतात.

गुरुवारी जन्म झाला म्हणून बिरसा नाव ठेवलं गेलं

बिरसा मुंडा यांचा जन्म गुरुवारी झाला असल्याने मुंडा समाजाच्या संस्कारानुसार त्यांचे नाव बिरसा ठेवण्यात आले. भारत सरकारने १० नोव्हेंबर २०२१ रोजी त्यांचा वाढदिवस आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. त्यांचे चित्र भारतीय संसदेच्या संग्रहालयात देखील प्रदर्शित केले आहे.

अभ्यासासाठी स्वीकारावा लागला ख्रिश्चन धर्म

बिरसा मुंडा यांच्या वडिलांचे नाव सुगना मुंडा होते. त्यांच्या आईचे नाव कर्मी हातू होते. त्याच्या मोठ्या काकांचे नाव कनू पॉल होते. त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. यानंतर त्यांचे वडीलही ख्रिश्चन मिशनरी झाले. त्यांच्या जन्मानंतर उलिहाटू गावातील त्यांचे कुटुंब कुरुंबडा गावात स्थायिक झाले. कुटुंबाच्या गरिबीमुळे बिरसा मुंडा आपल्या मामाच्या गावी गेले. गावाचे नाव आयुभटू होते. येथे बिरसा मुंडा यांनी दोन वर्षे शिक्षण घेतले. शाळेचे संचालक जयपाल नाग यांच्या सांगण्यावरून बिरसा मुंडा यांनी जर्मन मिशन स्कूलमध्ये प्रवेश घेतला. पण ख्रिश्चन शाळा असल्याने त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला. यानंतर बिरसा मुंडा यांचे नाव बिरसा दाऊद झाले.

आदिवासींची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करत असल्याचं पाहून संतप्त झाले बिरसा

ब्रिटीश राजवटीत इंग्रज आदिवासींवर अत्याचार करत असत. ते त्यांची संस्कृती तर नष्ट करत होतेच, पण त्यांना वाईट वागणूकही देत ​​होते. महसुलाचा बोजा आदिवासींवर लादला गेला. सावकारांच्या तावडीत आदिवासी अडकत चालले होते. त्यांच्या शेतातील कोठारं इंग्रजांनी ताब्यात घेतली होती. हे पाहून बिरसा मुंडा यांना वाईट वाटले. इंग्रजांविरुद्धच्या आंदोलनाचा बिगुल त्यांनी फुंकलं. भले ही चळवळ आधीच सुरू झाली असली तरी बिरसा मुंडा यांनी या चळवळीला उंची प्रदान करुन दिली हे मात्र नक्की.

महाराष्ट्रातही साजरी केली जाते जयंती

बिरसा मुंडा यांची जयंती महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालघर इथे बिरसा मुंडा यांना अभिवादन करणार आहेत. आज त्यानिमित्ताने पालघर जिल्ह्यात आदिवासीबहुल भागात विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे

 

 

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या