मराठी बातम्या  /  धर्म  /  Dr ambedkar : डॉ. आंबेडकरांचे 'हे' प्रेरणादायी विचार देतील जीवनाकडं बघण्याची नवी दृष्टी

Dr ambedkar : डॉ. आंबेडकरांचे 'हे' प्रेरणादायी विचार देतील जीवनाकडं बघण्याची नवी दृष्टी

HT Marathi Desk HT Marathi

Dec 06, 2023, 03:21 PM IST

  • Dr babasaheb ambedkar motivational thoughts: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६७ वा महापरिनिर्वाण दिन. आजच्या दिवशी बाबासाहेबांच्या विचारांचं स्मरण करून त्यांना आदरांजली वाहणं औचित्याचं ठरेल. जाणून घेऊया त्यांचे काही मौलिक विचार.

Dr Babasaheb Ambedkar

Dr babasaheb ambedkar motivational thoughts: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६७ वा महापरिनिर्वाण दिन. आजच्या दिवशी बाबासाहेबांच्या विचारांचं स्मरण करून त्यांना आदरांजली वाहणं औचित्याचं ठरेल. जाणून घेऊया त्यांचे काही मौलिक विचार.

  • Dr babasaheb ambedkar motivational thoughts: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६७ वा महापरिनिर्वाण दिन. आजच्या दिवशी बाबासाहेबांच्या विचारांचं स्मरण करून त्यांना आदरांजली वाहणं औचित्याचं ठरेल. जाणून घेऊया त्यांचे काही मौलिक विचार.

Dr babasaheb ambedkar mahaprinirvan din: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६७ वा महापरिनिर्वाण दिन. या महापरिनिर्वाण दिनी जगभरातून बाबासाहेबांना नमन केलं जात आहे. बाबासाहेबांच्या विचाराचं स्मरण केलं जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय? जाणून घ्या

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

Sita Navami : सीता नवमी कधी आहे? जाणून घ्या तिथीचे महत्व, पूजनाची योग्य पद्धत, मंत्र आणि स्तोत्र

बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल, १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू इथं झाला. त्यांचं मूळ गाव महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांचे चौदावे अपत्य होते. त्यांपैकी गंगा, रमा, मंजुळा आणि तुळसा या मुली आणि बाळाराम, आनंदराव व भीमराव हे मुलं जगली. भीमराव सगळ्यात लहान होते. पण याच लहान भीमरावनं पुढं अफाट कर्तृत्व गाजवून जगापुढं एक आदर्श घालून दिला.

Mahaparinirvan Din 2023: 'या' मराठी कलाकारांनी मोठ्या पडद्यावर चितारलेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर!

हिंदू धर्मानं अस्पृश्यांना समान व न्याय्य वागणूक द्यावी यासाठी आंबेडकरांनी सर्व प्रकारचे प्रयत्न केले आणि त्यातूनच त्यांनी धर्मांतर केले. १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी त्यांनी नागपूर इथं आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. बाबासाहेब हे केवळ घटनेचे कायद्याचे अभ्यासक नव्हते तर समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांवरही त्यांची हुकूमत होती. आपल्या विचारांतून त्यांनी लाखो लोकांमध्ये जगण्याची व लढण्याची नवी उमेद जागवली. आजच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या या विचारांचं स्मरण करणं औचित्याचं ठरेल.

डॉ. आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हे दूध पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.

एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय

माणसाने आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा.

शक्तीचा उपयोग वेळ आणि काळ पाहूनच करावा.

माणूस कितीही मोठा विद्वान असो, पण तो स्वत:ला इतरांचा द्वेष करण्याइतका मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्यासारखा असतो.

माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटलीच तर ती फक्त आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची वाटायला हवी.

माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे.

Mahaparinirvan Diwas 2023 : महापरिनिर्वाण दिनी डॉ. आंबेडकरांना करा अभिवादन, शेअर करा खास मेसेज

जात म्हणजे विटांची भिंत किंवा काटेरी तारांच्या कुंपणासारखी भौतिक गोष्ट नाही. जी हिंदूंना एकत्र येण्यापासून रोखते. ती एक धारणा किंवा कल्पना आहे. ती मनाची अवस्था आहे.

वाचाल तर वाचाल.

जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहीतरी करून दाखवायचं आहे अशी महत्वकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.

शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा !

उदासीनता हा सर्वात वाईट रोग आहे, जो लोकांना बाधित करू शकतो.

आयुष्य मोठे नसावे तर ते महान असावे

महान माणूस एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा वेगळा असतो कारण तो समाजाचा सेवक बनण्यास तयार असतो.

इतिहास साक्ष आहे, जिथं नीतीशास्त्र आणि अर्थशास्त्राचा संघर्ष होतो, तिथं विजय नेहमी अर्थशास्त्राचाच होतो. हितसंबंध किंवा स्वार्थ हा कधीच स्वत:हून कोणीही सोडत नाही, त्यासाठी पुरेशी ताकद लावून ते मोडून काढावे लागतात.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या