मराठी बातम्या  /  धर्म  /  Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरास अजमेरची खास भेट, एकाच वेळी तयार होतील १२०० पोळ्या

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरास अजमेरची खास भेट, एकाच वेळी तयार होतील १२०० पोळ्या

Jan 09, 2024, 01:21 PM IST

  • Ayodhya Ram Mandir 2024: अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा आणि श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना, हा एक अविस्मरणीय दिवस राहील. कारण येत्या २२ जानेवारीला होणाऱ्या या सोहळ्यासाठी आगळ्या-वेगळ्या आणि आश्चर्यचकीत करणाऱ्या गोष्टींची रीघ लागली आहे.

ayodhya ram mandir pran pratishtha

Ayodhya Ram Mandir 2024: अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा आणि श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना, हा एक अविस्मरणीय दिवस राहील. कारण येत्या २२ जानेवारीला होणाऱ्या या सोहळ्यासाठी आगळ्या-वेगळ्या आणि आश्चर्यचकीत करणाऱ्या गोष्टींची रीघ लागली आहे.

  • Ayodhya Ram Mandir 2024: अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा आणि श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना, हा एक अविस्मरणीय दिवस राहील. कारण येत्या २२ जानेवारीला होणाऱ्या या सोहळ्यासाठी आगळ्या-वेगळ्या आणि आश्चर्यचकीत करणाऱ्या गोष्टींची रीघ लागली आहे.

अयोध्या राम मंदिराचा ऐतिहासीक क्षण म्हणजे २२ जानेवारी सोमवार रोजी होणारा उद्घाटन सोहळा आहे. देशभराचे या अविस्मरणीय दिवसावर लक्ष आहे आणि त्याचीच खास तयारी सुरू आहे. यासाठी गुजरातहून येत असलेली भलीमोठी अगरबत्ती असो किंवा भाजीविक्रेत्याने दिलेले घड्याळ सर्वच भेटवस्तूंचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे. आता चर्चा आहे ती पोळ्या बनवण्याच्या यंत्राची, जाणून घ्या याचे खास वैशिष्ट्य.

ट्रेंडिंग न्यूज

Importance of Jap Mala : हिंदू धर्मातील जप माळेत १०८ मनीच का असतात? विशेष आहे यामागचे कारण

Shani Dev : शनिदेवाची मूर्ती घरात का ठेवू नये? यामागील रहस्य जाणून घ्या

Baby Born in June : जूनमध्ये जन्मलेल्या लोकांमध्ये हे गुण असतात, ते या करिअरमध्ये यशस्वी होतात, जाणून घ्या

Astro Tips : आवडता लाइफ पार्टनर मिळवण्यासाठी हे उपाय करा, आयुष्यातील एकटेपणा काही दिवसात दूर होईल

असे आहे पोळ्यांचे यंत्र

अयोध्या शहर हे जगातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र बनणार आहे. सोमवारी २२ जानेवारी रोजी होणारा भव्य-दिव्य सोहळ्याला आमंत्रीत पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाईल. यासाठी अजमेरवासीयांनी अयोध्येतील भोजनशाळेत तयार होणाऱ्या पोळ्यांसाठी खास मशीन पाठवले आहे.

अजमेरहून आठ मशीन पाठवण्यात आले आहेत तर आणखी मशीन बनवण्यात येत आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरात पाठवण्यात आलेले पोळी बनवण्याचे हे मशीन अजमेर येथील एका कारखान्यात तयार करण्यात आले असून, हे मशीन एका तासात १२०० पोळ्या बनवू शकते.

Ayodhya Ram Temple: अयोध्येतील श्रीराम मंदिरात भाजीविक्रेत्याने भेट दिली अद्भूत घड्याळ

यज्ञ कर्मासाठी तूप 

सोमवार २२ जानेवारीला ११ वाजेपासून सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या ऐतीहासीक सोहळ्यात होणाऱ्या यज्ञ कर्मासाठी शुद्ध गाईच्या तूपाचा वापर करण्यात येणार आहे. याच तूपात मंदिरातील पहिला अखंड दिवा प्रज्वलित करण्यात येईल. यासाठी अयोध्येत ६ क्विंटल/ ३० किलो तूप आणण्यात आले आहे. हे तूप राजस्थानमधील गो शाळेतून आणण्यात आले आहे. तर दूसरीकडे नेपाळवरून आणलेल्या पाण्याने प्रभू रामाचा जलाभिषेक केला जाणार आहे. नेपाळमधील पाण्याने भरलेले कलशदेखील अयोध्येत दाखल झाले आहेत.

असा होईल प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा

रामलल्लाच्या अभिषेकसाठी ८४ सेकंदांचा शुभ काळ निश्चित करण्यात आला आहे. मकर संक्रांत १५ जानेवारीला आहे. या विशेष दिवशी श्रीरामाच्या मूर्तीची म्हणजेच श्री रामाच्या बालस्वरूपाची मूर्ती गर्भगृहात स्थापित केली जाईल. १६ जानेवारी पासून श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना करण्याचा विधी सुरू होईल.

१७ जानेवारी रोजी रामाच्या पालखीची परिक्रमा होईल. १८ जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठा प्रक्रिया सुरू होईल. याशिवाय मंडप प्रवेश पूजा, वास्तुपूजा, गणेश पूजा, वरुण पूजा, विघ्नहर्ता आणि मार्तिका पूजा होईल. १९ जानेवारी या शुभ दिवशी राम मंदिरात यज्ञ कुंडात अग्नि प्रज्वलीत केला जाईल. नवग्रहांचे होम-हवन होईल. २० जानेवारी रोजी विविध नद्यांमधून गोळा केलेल्या ८१ कलशांच्या पाण्याने राम मंदिराचे गर्भगृह पवित्र केले जाईल.

२१ तारखेला विशेष पूजा आणि हवन दरम्यान १२५ कलशांनी श्रीरामाचे दिव्य स्नान करतील. हा अभिषेक सोहळा अविस्मरणीय राहील. २२ जानेवारी मध्यांन्न वेळी मृगशिरा नक्षत्रात गर्भगृहात बाळ स्ववरूप रामाच्या मूर्तीची स्थापना केली जाईल. तसेच या दिवशी संपूर्ण विधीपूर्वक महापूजा केली जाईल.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या